गडचिरोली: प्रसूतीच्या कळा सोसत होती आई, डॉक्टर नसल्याने माय लेकराचा अंत

मुंबई तक

Gadchiroli News : गडचिरोली जिल्ह्यातून मन सुन्न करून टाकणारी घटना घडली आहे. प्रसूतीच्या कळा आई सोसत होती, मात्र यादरम्यान वेळेवर डॉक्टर उपलब्ध न झाल्याने आईसह नवजात बाळाचा दुर्दैवी अंत झाला आहे.

ADVERTISEMENT

Gadchiroli News
Gadchiroli News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

प्रसूतीच्या कळा सोसत होती आई रुग्णालयात डॉक्टरच नाही 

point

काहीच मिनिटांत बाळासह आईचा दुर्दैवी अंत 

Gadchiroli News : व्येंकटेश दुडमवार - गडचिरोली जिल्ह्यातून मन सुन्न करून टाकणारी घटना घडली आहे. चामोर्शी तालुक्यातील रहिवासी असलेल्या जिजा हंसराज सतार (वय 27) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. नवजात बालकाचा देखील काहीच मिनिटांत मृत्यू झाल्याची घटना आहे. वैद्यकीय उपचार न मिळाल्याने बाळासह आईने जीवनयात्रा संपवल्याचा कुटुंबियांचा आरोप आहे. डॉक्टर उपलब्ध नसल्याचा मृत महिलेच्या कुटुंबीयाचे म्हणणे आहे. या प्रकरणी आता चामोशी ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेबाबतचा गंभीर प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. 

हे ही वाचा : जालन्यात झोका खेळताना पाचवीच्या मुलाला लागला फास, हृदयद्रावक घटनेत मृत्यू

प्रसूतीच्या कळा सोसत होती आई रुग्णालयात डॉक्टरच नाही 

जिजा सतार यांना त्यांच्या पहिल्या प्रसूतीनंतर 23 ऑगस्ट रोजी पहाटे चार्मोशी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रसूतीकळा सुरू झाल्यानंतर तब्बल सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी स्त्रीरोग तज्ज्ञ उपस्थित नव्हते, असा कुटुंबियांनी आरोप केला आहे. रुग्णालयातील पारिचारिकांकडे या घटनेची विचारणा केली असता, रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याची पारिचारिकांनी माहिती दिली. 

काहीच मिनिटांत बाळासह आईचा दुर्दैवी अंत 

मात्र, योग्य वेळेवर उपचार न मिळाल्याने काहीच मिनिटांत नवजात बाळाचा दुर्दैवी अंत झाला. जिजा सतार यांची प्रकृती अगदीच गंभीर झाली होती. उपचादारम्यान त्यांचाही अंत झाला. एकाच घटनेत माता आणि नवजात बालक दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाल्याने सतार कुटुंब शोकाकुल झाले आहे. 

हे ही वाचा : नवऱ्यासह सासूने सुनेला टॉयलेट क्लीनर पाजलं, उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू

दरम्यान, चामोर्शी ग्रामीण रुग्णालयाती दोन स्त्रीरोग तज्ज्ञांनी अद्यापही नियुक्ती न केल्याने प्रसूती वेळी संबंधित तज्ज्ञ उपलब्ध नव्हते असा आरोप करण्यात आला. या गंभीर  परिस्थितीत ग्रामीण भागातील सरकारी रुग्णालयांच्या कामगाजावर प्रश्न उपस्थित केला जातोय.