मुंबई : LBW आऊट दिल्याने फलंदाज भडकला, पंचाला बॅटने झोडपलं, 36 वर्षांनंतर अटक
mumbai borivali cricket match umpire attack : बोरीवलीत 1990 मध्ये क्रिकेट सामन्यात LBW निर्णयावरून अंपायरवर हल्ला केल्याच्या प्रकरणात 36 वर्षांपासून फरार असलेल्या ओमप्रकाश पासीला पोलिसांनी अटक केली आहे. मीरा रोडमध्ये तपास आणि स्थानिकांकडून चौकशी करत असतानाच पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मुंबई : LBW आऊट दिल्याने फलंदाज भडकला
पंचाला बॅटने झोडपलं, 36 वर्षांनंतर अटक
mumbai borivali cricket match umpire attack : मुंबईत तब्बल 36 वर्षांपूर्वी क्रिकेट सामन्यादरम्यान झालेल्या वादात अंपायरवर हल्ला केल्याच्या प्रकरणात बोरीवली पोलिसांनी एका फरार आरोपीला अटक केली आहे. ही घटना 1990 मधील असून, आरोपी त्या दिवसापासून पोलिसांच्या हाती लागला नव्हता. आता दीर्घ काळानंतर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या मदतीने त्याचा शोध घेत त्याला मीरा रोड येथून ताब्यात घेतले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीची ओळख 55 वर्षीय ओमप्रकाश पासी अशी झाली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून पुढील चौकशी करण्यात येत आहे.
हेही वाचा : राहुल गांधींना विद्यार्थीनीकडून सरप्राईज किस, "Cute मोमेंट" व्हायरल VIDEO
LBW बाद घोषित केल्याने वाद
ही घटना 1990 मध्ये मुंबईतील बोरीवली परिसरात आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेदरम्यान घडली होती. सामन्यात फलंदाज असलेल्या ओमप्रकाश पासीला अंपायरने LBW बाद घोषित केले होते. या निर्णयावरून पासी आणि अंपायर यांच्यात वाद झाला. काही क्षणांतच हा वाद हिंसक झाला आणि संतापलेल्या पासीने अंपायरच्या डोक्यावर क्रिकेटच्या बॅटने हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात अंपायर गंभीर जखमी झाला होता. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला आणि अनेक वर्षे पोलिसांच्या नजरेआड राहिला.
हेही वाचा : 30 वर्षीय गर्भवती महिलेवर भावासह काकाकडून अत्याचार, प्रायव्हेट पार्टचे व्हिडिओ केले रेकॉर्ड
