राहुल गांधींना विद्यार्थीनीकडून सरप्राईज किस, "Cute मोमेंट" व्हायरल VIDEO

मुंबई तक

Rahul Gandhi pune students event kiss viral video : पुण्यातील राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात एका विद्यार्थिनीने त्यांच्या गालावर सरप्राईज किस केलं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेवर सोशल मीडिया यूजर्सकडून विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

ADVERTISEMENT

Rahul Gandhi pune students event kiss viral video
Rahul Gandhi pune students event kiss viral video
Google CTA

बातम्या हायलाइट

point

राहुल गांधींना विद्यार्थीनीकडून सरप्राईज किस

point

"क्यूट मोमेंट" व्हायरल VIDEO

Rahul Gandhi pune students event kiss viral video : पुण्यात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका विद्यार्थिनीने राहुल गांधी यांच्या गालावर सरप्राईज किस केल्याचे दिसत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये राहुल गांधी मंचावर उपस्थित असलेल्या लोकांसोबत सेल्फी घेताना दिसत आहेत. याचवेळी एक तरुण विद्यार्थिनी त्यांच्याजवळ येते. सेल्फी घेतल्यानंतर ती अचानक राहुल गांधी यांच्या गालावर किस करते. यानंतर राहुल गांधी काही क्षण तिच्याशी संवाद साधतात. त्यानंतर ते आपल्या सुरक्षारक्षकांसोबत मंचावरून खाली जातात. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर झाल्यानंतर  व्हायरल झाला. 

हेही वाचा : कुणाल चांदगुडेच्या मावशीचा संताप, सोशल मीडियावरील व्हिडिओ पाहून केली 'ती' विनंती

‘क्यूट मोमेंट’, राहुल गांधींना विद्यार्थिनीकडून सरप्राईज किस 

‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमाच्या ठिकाणी कॉन्सर्टसारखी रोषणाई आणि मोठ्या संख्येने तरुणांची उपस्थितीही व्हिडिओमध्ये दिसत आहे. या घटनेवर सोशल मीडिया यूजर्सकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यात आल्या. काहींनी या घटनेचा संबंध विद्यार्थिनीच्या आत्मविश्वासाशी आणि राहुल गांधी यांच्याप्रती तिच्या सहजतेशी जोडला, तर काहींनी याला ‘क्यूट मोमेंट’ म्हटले.

हेही वाचा : इथेनॉलवर जडला जीव, पण साखरेने केला गेम! मोदी सरकार साखर स्वस्त करणार की नाही?