"जन्माने ज्यू आणि कर्माने अस्सल मराठी", यास्मिन शेख यांच्या जाण्याने राज ठाकरे हळहळले
Raj Thackeray on Yasmin Shaikh death : "यास्मिन बाई या जन्माने ज्यू आणि कर्माने अस्सल मराठी होत्या", अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी यास्मिन शेख यांच्या कार्याबाबत सविस्तर पोस्ट लिहिली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
"जन्माने ज्यू आणि कर्माने अस्सल मराठी"
यास्मिन शेख यांच्या जाण्याने राज ठाकरे हळहळले
Raj Thackeray on Yasmin Shaikh death : मराठी भाषा आणि व्याकरण तज्ज्ञ यास्मिन शेख यांचं निधन झालं. वयाच्या 101 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील फेसबुक पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. शिवाय, मराठी भाषेसाठी यास्मिन शेख यांनी मराठी भाषेसाठी कशाप्रकारे काम केलं..याबाबतही राज ठाकरेंनी सविस्तर लिहिलं आहे. ते नेमकं काय म्हणाले? सविस्तर जाणून घेऊयात..
हेही वाचा : 30 वर्षीय गर्भवती महिलेवर भावासह काकाकडून अत्याचार, प्रायव्हेट पार्टचे व्हिडिओ केले रेकॉर्ड
राज ठाकरेंची पोस्ट जशीच्या तशी
ज्येष्ठ भाषातज्ज्ञ आणि मराठी व्याकरणाच्या अभ्यासक डॉ. यास्मिन शेख यांचं निधन झालं. यास्मिन बाई या जन्माने ज्यू आणि कर्माने अस्सल मराठी होत्या.
यास्मिनबाईंसारख्या व्यक्तींबद्दल मला कमालीचं कुतूहल आणि आदर आहे. ते फक्त त्या ज्यू आणि तरीही मराठी भाषेसाठी आयुष्य वाहिलं म्हणून नाही. पण एखादी भाषा आणि तिचा आत्मा टिकून रहावा या आग्रहासाठी संपूर्ण आयुष्य देणं हे विलक्षण आहे आणि आजच्या काळात अद्भूत आहे.
