सिंधुदुर्ग : बसमधून उतरली पण घरी पोहोचलीच नाही, नदीत सापडला मृतदेह, नंदिनीसोबत काय घडलं?

कुडाळमध्ये एका तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. बसस्टॉपवरुन घरी जात असताना अज्ञात हल्लेखोराने तिच्यावर प्राणघातक हल्ला केला.

ADVERTISEMENT

Sindhudurg Crime News
Sindhudurg Crime News
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

सिंधुदुर्ग हादरले!

point

हॉटेल मॅनेजमेंट शिकणाऱ्या तरुणीची हत्या

point

नेमकं कारण काय?

Sindhudurg Crime News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातून एक अत्यंत सुन्न करणारी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. वर्दे येथे हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या एका 24 वर्षीय तरुणीची अज्ञात हल्लेखोराने धारदार शस्त्राने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली. नंदिनी किरण पालव असं मृत तरुणीचं नाव आहे. 17 ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडलेल्या या निर्घृण हत्याकांडाने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा हादरून गेला असून, स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड भीती व संतापाचे वातावरण पसरले आहे.

बसस्टॉपवरुन घरी जातानाच...

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मयत नंदिनी पालव ही हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेत होती. घटनेच्या दिवशी सायंकाळी 5:30 ते 6 च्या सुमारास ती कडावल येथील बसस्टॉपवर उतरली होती. बसस्टॉपवरून उतरल्यानंतर ती पायी आपल्या वर्दे येथील घराच्या दिशेने जात होती. दरम्यान, वाटेतच निर्जन ठिकाणी दबा धरून बसलेल्या अज्ञात हल्लेखोराने तिला गाठले. आरोपीने तिच्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेली नंदिनी नंतर नदीत मृतावस्थेत आढळून आली.

हे ही वाचा : नागरिकांच्या भावनेवर निकाल लागू शकत नाही, असं गवई का बोलले?

हत्येचं नेमकं कारण काय?

या थरारक घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तातडीने पोलिसांना पाचारण केले. माहिती मिळताच कुडाळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी आणि तपास पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. हत्या का करण्यात आली, त्यामागे पूर्ववैमनस्य होते की अन्य काही कारण, याचा कसून शोध पोलीस घेत असून अज्ञात आरोपीचा सुगावा लावण्यासाठी वेगवेगळ्या दिशांनी पथके रवाना करण्यात आली आहेत.

हे ही वाचा : वेदर रिपोर्ट : चक्रीवादळ तयार होणार? महाराष्ट्रात पाऊस परतणार हे निश्चित?

सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

शांत व सुरक्षित समजल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात घडलेल्या या दुर्दैवी आणि संतापजनक घटनेमुळे महिलांच्या आणि तरुणींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा अत्यंत गंभीररीत्या ऐरणीवर आला आहे. संध्याकाळच्या वेळी आपल्या घरी परतणाऱ्या एका निष्पाप विद्यार्थिनीची अशाप्रकारे हत्या झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आरोपीला लवकरात लवकर अटक करून त्याला कठोर कायदेशीर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी आता स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.