घरगुती वाद की आणखी काही? तिघांच्या मृत्यूचं कारण काय? दोन्ही कुटुंबियांचे वेगवेगळे दावे
Chhatrapati Sambhajinagar Suicide Case : छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगरावर एकाच कुटुंबातील तिघांच्या मृत्यूनंतर संगीता आणि मुरलीधर या दाम्पत्यांच्या सासर आणि माहेरच्या लोकांनी वेगवेगळे दावे केले आहेत. कौटुंबिक वाद, गैरसमज आणि कुणालच्या मृत्यूबाबत दोन्ही बाजूंच्या दाव्यांमुळे प्रकरणाचे गूढ वाढले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
घरगुती वाद की आणखी काही?
संगीता आणि मुरलीधर यांच्या कुटुंबियांचे वेगवेगळे दावे
Chhatrapati Sambhajinagar Suicide Case : छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगरावरून एकाच कुटुंबातील तिघे पडून मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर या प्रकरणाची वेगवेगळी चर्चा सुरू आहे. आता संगीता चांदगुडे आणि मुरलीधर चांदगुडे या दाम्पत्यांच्या सासर आणि माहेरच्या लोकांनी वेगवेगळे दावे केले आहेत. दोन्ही कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार संगीता आणि मुरलीधर यांच्यात प्रेम होते, मात्र लग्नानंतर त्यांच्या कौटुंबिक जीवनात वाद निर्माण झाले होते. या घटनेमागे नेमके काय कारण होते, याचा तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा : भारताच्या तरुणांना नोकऱ्या का मिळत नाहीत? Niti आयोगाचे धक्कादायक आकडे बघाच!
आई-वडिलांनी पुन्हा एकत्र यावे, अशी होती कुणालची भावना
मुरलीधर यांच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, संगीता मुरलीधर यांना त्यांच्या कुटुंबापासून वेगळे करत होती. मुरलीधर यांना त्यांच्या बहिणीकडे जाऊ दिले जात नव्हते, असा दावा त्यांच्या घरच्यांनी केला आहे. तसेच संगीता आणि मुरलीधर यांचे लव्ह मॅरेज झाले होते आणि लग्नानंतर ते वेगळे राहत होते, असेही सांगण्यात आले. कुणालला मात्र आई-वडिलांनी पुन्हा एकत्र यावे, असे वाटत होते आणि त्यासाठी तो प्रयत्न करत होता. कुणाल दोघांना समजावण्याचा प्रयत्न करत असताना तो डोंगरावर गेला आणि त्यावेळी त्याचा तोल जाऊन तो खाली पडला. ही घटना पाहून आईनेही उडी मारल्याचा दावा करण्यात आला आहे. या घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला.
हेही वाचा : भारताच्या तरुणांना नोकऱ्या का मिळत नाहीत? Niti आयोगाचे धक्कादायक आकडे बघाच!
