पुणे : राहुल गांधींच्या 'छात्रों की गुंज'मधल्या कॅमेरापलिकडच्या गोष्टी

मुंबई तक

Rahul Gandhi chatron ki gunj : राहुल गांधींच्या पुण्यातील ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात मोठ्या संख्येने तरुणी सहभागी झाल्या. भाषेपासून कार्यक्रमातील व्यवस्था आणि माध्यमांवरील निर्बंधांपर्यंत अनेक कॅमेरापलीकडच्या गोष्टी समोर आल्या.

ADVERTISEMENT

Rahul Gandhi chatron ki gunj
Rahul Gandhi chatron ki gunj
Google CTA

बातम्या हायलाइट

point

पुण्यात राहुल गांधींच्या 'छात्रों की गुंज'मधल्या कॅमेरापलिकडच्या गोष्टी

point

कार्यक्रमातील खास क्षण, पडद्यामागच्या हालचाली आणि कॅमेरापलिकडच्या गोष्टींचा हा खास आढावा

Rahul Gandhi chatron ki gunj : देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या पुण्यातील ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात मोठ्या संख्येने तरुणी सहभागी झाल्या. हा कार्यक्रम महिलांसाठी आयोजित करण्यात आला होता. कॅमेऱ्यासमोर राहुल गांधींचा महिलांशी संवाद आणि कार्यक्रमातील विविध मुद्दे पाहायला मिळाले. मात्र, कार्यक्रमाच्या ठिकाणी कॅमेऱ्याच्या पलीकडेही अनेक गोष्टी घडत होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राहुल गांधी यांनी इंग्रजीतून भाषणाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी हिंदीत बोलण्याचा प्रयत्न केला. पुणे आणि महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सुरुवात मराठीतून झाली असती तर वेगळा प्रतिसाद मिळाला असता, अशी चर्चा कार्यक्रमाच्या ठिकाणी काही काँग्रेस नेत्यांमध्येही होती. याच कार्यक्रमात एका आदिवासी समाजातील तरुणीने राहुल गांधींसमोर मराठीतून आपल्या समस्या मांडल्या. तिला हिंदीत बोलताना सहज वाटत नसल्याने तिने मराठीतूनच आपले म्हणणे मांडले. काँग्रेसच्या एका स्वयंसेविकेने तिचे म्हणणे राहुल गांधींना भाषांतर करून सांगितले. तिच्या बोलण्याला उपस्थितांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. राहुल गांधी यांनीही तिच्याशी संवाद साधत तिला काही प्रश्न विचारले.

हेही वाचा : भारताच्या तरुणांना नोकऱ्या का मिळत नाहीत? Niti आयोगाचे धक्कादायक आकडे बघाच!

पाणी, जेवण आणि वॉशरूमसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव

या कार्यक्रमात स्थानिक नेत्यांची लांबलचक भाषणे ठेवण्यात आली नाहीत. त्याऐवजी संगीत आणि तरुणांना आवडणारा कार्यक्रम ठेवण्यात आला. त्यामुळे सुरुवातीपासून आलेल्या तरुणींची गर्दी बराच वेळ टिकून राहिली. मात्र, राहुल गांधी कार्यक्रमस्थळी आल्यानंतर काही वेळाने मागील बाजूची गर्दी कमी होऊ लागली. यामागे अनेक कारणे असल्याचे कार्यक्रमस्थळी जाणवले. अनेक तरुणी दुपारी तीन-साडेतीनपासूनच कार्यक्रमासाठी आल्या होत्या. राहुल गांधी साडेसातच्या सुमारास आले. त्यानंतर त्यांना घरी जाण्यासाठीही वेळ लागणार होता. पुण्यातील वाहतूक कोंडी लक्षात घेता काही जणी लवकर निघाल्या. कार्यक्रमाच्या ठिकाणी बसण्याची सोय नव्हती. अनेकांना बराच वेळ उभे राहावे लागले. खाण्यापिण्याची सुविधाही उपलब्ध नव्हती. पाणी, जेवण आणि वॉशरूमसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचेही सांगण्यात आले. महिलांच्या कार्यक्रमात मासिक पाळीच्या काळातील गरजा आणि वॉशरूमची सुविधा यांचाही विचार करायला हवा होता, अशी प्रतिक्रिया काही महिलांनी व्यक्त केली.

हेही वाचा : Maharashtra Weather : राज्यात पावसाचा वेग संथ, 'या' जिल्ह्यांना यलो अलर्टचा अंदाज