Personal Finance: सोने की SIP? 10 वर्षांत कोण बनलं श्रीमंत?

मुंबई तक

सोने खरेदी करणारा आणि दरमहा ₹5,000 SIP करणारा गुंतवणूकदार यांच्यात 10 वर्षांत किती फरक पडला? सोन्याचा परतावा, Nifty 50 आणि SIPचा हिशेब जाणून घ्या. मध्यमवर्गीयांसाठी सोने की SIP अधिक फायदेशीर ठरू शकते, जोखीम किती आणि भविष्यासाठी योग्य पर्याय कोणता, याचा सविस्तर आढावा.

ADVERTISEMENT

personal finance gold vs sip 10 year returns middle class investment comparison
Personal Finance
Google CTA

मुंबई: भारतातील मध्यमवर्गासाठी सोने आणि SIP हे गुंतवणुकीचे दोन लोकप्रिय पर्याय आहेत. एका बाजूला पिढ्यांपिढ्या चालत आलेला सोन्यावरील विश्वास, तर दुसऱ्या बाजूला शिस्तबद्ध पद्धतीने म्युच्युअल फंडात पैसे गुंतवण्याची वाढती प्रवृत्ती. पण प्रश्न असा आहे की, गेल्या 10 वर्षांत दरमहा 5000 रुपयांचे सोने खरेदी करणारा गुंतवणूकदार आणि दरमहा 5000 रुपये SIP करणारा गुंतवणूकदार यांच्याकडे आज किती पैसा असता? या प्रश्नाचे उत्तर पाहिले तर दोन्ही पर्यायांची ताकद आणि मर्यादा स्पष्ट होतात.

5000 रुपये महिन्याला गुंतवले तर?

  • समजा, एखाद्या व्यक्तीने 10 वर्षांपूर्वीपासून दरमहा 5000 रुपये गुंतवायला सुरुवात केली.
  • 10 वर्षांत एकूण गुंतवणूक:
  • 5000 रुपये × 120 महिने = 6 लाख रुपये
  • आता याच 6 लाखांची दोन वेगवेगळ्या पद्धतीने गुंतवणूक केली असती, असे गृहीत धरू.

पर्याय 1: सोने

भारतामध्ये 24K सोन्याचा वार्षिक सरासरी दर 2016 मध्ये सुमारे 28,624 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 2026 मध्ये तो सुमारे 1.50 लाख रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर पोहोचला आहे. उपलब्ध ऐतिहासिक किमतींवरून 2016 ते 2026 या कालावधीत सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे.

या कालावधीसाठी सोन्याच्या किंमतीचा CAGR साधारण 18%च्या आसपास दिसतो. मात्र हा दर थेट 'दरमहा 5,000 रुपये सोन्यात गुंतवले तर मिळणारा परतावा' मानता येत नाही, कारण SIP सारखी मासिक खरेदी आणि एकरकमी गुंतवणूक यांचे गणित वेगळे असते.

18%च्या आसपासचा वार्षिक दर केवळ उदाहरणासाठी धरल्यास 5,000 रुपये मासिक गुंतवणुकीचे मूल्य सुमारे 16-17  लाखांच्या आसपास जाऊ शकते.