गर्लफ्रेंडच्या आवडीचा पदार्थ आणायला गेला, अन् पत्नीने रंगेहात पकडलं, नंतर काय घडलं?
UP Crime News : प्रेयसीसाठी चोले भटुरे आणायला गेलेल्या अजयला पत्नीने ब्रिजघाटमध्ये रंगेहाथ पकडलं. पत्नी आणि कुटुंबीयांनी केलेल्या मारहाणीनंतर वाद पोलीस ठाण्यात पोहोचला आणि अखेर समझोता झाला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
गर्लफ्रेंडच्या आवडीचा पदार्थ आणायला गेला
अन् पत्नीने रंगेहात पकडलं, नंतर काय घडलं?
उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यात चोले भटुरे आणण्यासाठी घराबाहेर पडलेल्या एका व्यक्तीला त्याच्या पत्नीने बाजारातच रंगेहाथ पकडल्याची घटना समोर आली आहे. प्रेयसीसाठी चोले भटुरे घेण्यासाठी गेलेल्या पतीला पाहिल्यानंतर पत्नी आणि तिच्या कुटुंबीयांनी त्याला मारहाण केली. या घटनेनंतर बाजारात मोठी गर्दी झाली आणि प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोहोचले. अखेर पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर दोन्ही बाजूंनी वाद मिटवण्यास सहमती दर्शवली आणि पती-पत्नी घरी परतले.
हेही वाचा : कोल्हापूर : वडिलांच्या मित्राने खेळायला घेऊन जाण्याच्या बहाण्याने चिमुकलीला पंचगंगा नदीकडे नेलं अन्...
पत्नीने पतीला रंगेहात पकडलं, नेमकं काय घडलं?
ही घटना हापूर जिल्ह्यातील ब्रिजघाट परिसरात घडली. या ठिकाणी अजय नावाचा व्यक्ती आपल्या प्रेयसीसोबत एका गेस्ट हाऊसमध्ये थांबला होता. यादरम्यान तो बाहेर दोन प्लेट चोले भटुरे आणण्यासाठी गेला होता. त्याच वेळी त्याची पत्नी कविता आपल्या कुटुंबीयांसह तिथे पोहोचली. अजय दुसऱ्या महिलेसोबत असल्याची माहिती मिळाल्यानंतर कविता कुटुंबीयांसह ब्रिजघाटला आली होती. गेस्ट हाऊसजवळ अजय दिसल्यानंतर तिने त्याला गाठलं. त्यानंतर या प्रकरणाला वेगळंच वळण मिळालं आणि परिसरात लोकांची गर्दी जमली.
घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळाचं वातावरण
कविताने अजयवर गंभीर आरोप केले आहेत. अजय दररोज सकाळी कामावर जात असल्याचं सांगून घरातून बाहेर पडत होता, मात्र प्रत्यक्षात तो आपल्या प्रेयसीला भेटत असल्याचा तिचा दावा आहे. अजयच्या या वागण्यामुळे कुटुंबीय काही काळापासून त्रस्त असल्याचंही सांगण्यात आलं. ब्रिजघाटमध्ये अजय असल्याची माहिती मिळाल्यानंतर कविता आपल्या कुटुंबीयांसह तिथे पोहोचली. अजयला पाहिल्यानंतर तिने त्याच्याशी जाब विचारला. त्यानंतर कविता आणि तिच्या कुटुंबीयांनी बाजारातच अजयला मारहाण केली. या घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं.
दरम्यान, अजयने पत्नीने केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. आपण कोणत्याही महिलेसोबत नव्हतो, असं त्याने सांगितलं. घरातील मानसिक तणावामुळे आपण ब्रिजघाटला आलो होतो, असा दावा त्याने केला. मात्र कविता त्याच्या स्पष्टीकरणावर समाधानी नव्हती. आपण एकटाच असताना दोन प्लेट चोले भटुरे कोणासाठी आणत होता, असा सवाल तिने केला. या वादानंतर प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं. पोलिसांनी दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून हस्तक्षेप केला. त्यानंतर दोन्ही पक्षांनी प्रकरण मिटवण्यास सहमती दर्शवली आणि अजय व कविता पुन्हा घरी परतले.
