कोल्हापूर : वडिलांच्या मित्राने खेळायला घेऊन जाण्याच्या बहाण्याने चिमुकलीला पंचगंगा नदीकडे नेलं अन्...
Kolhapur Crime News : बागेत खेळायला घेऊन जाण्याच्या बहाण्याने पाच वर्षांच्या मुलीला पंचगंगा नदी परिसरात नेल्याचा आरोप. अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या संशयिताला नागरिकांनी रोखून पोलिसांच्या स्वाधीन केलं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पाच वर्षांच्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न
पंचगंगा नदी परिसरात संशयिताला नागरिकांचा चोप, पोलिसांकडून अटक
Kolhapur Crime News : कोल्हापुरात ओळखीच्या मित्राच्या पाच वर्षांच्या मुलीला बागेत खेळायला घेऊन जाण्याच्या बहाण्याने पंचगंगा नदी परिसरात नेऊन तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत गजानन इंगवले याच्यावर आरोप असून, काही तरुणांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार वेळीच उघडकीस आला. नागरिकांनी गजानन इंगवलेला पकडून मारहाण केली आणि त्यानंतर त्याला लक्ष्मीपुरी पोलिसांच्या स्वाधीन केलं. पोलिसांनी गजानन इंगवलेविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. बुधवारी 30 नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास पंचगंगा नदी परिसरात ही घटना घडली.
हेही वाचा : रक्तबंबाळ अवस्थेत 180 प्रवाशांना वाचवणाऱ्या भारतीय वैमानिकासाठी पीएम मोदींची पोस्ट, म्हणाले...
मुलीला बागेत घेऊन जातो म्हणाला अन् पंचगंगा नदी परिसरात नेलं
कोल्हापुरातील बेलबाग परिसरात संबंधित कुटुंब राहतं. कुटुंबप्रमुखाला नऊ वर्षांचा मुलगा आणि पाच वर्षांची मुलगी आहे. ते गंगावेश तालमीजवळ रस्त्यावर कणसे विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. शिवाजी पेठेतील तालमीजवळ राहणाऱ्या गजानन इंगवलेशी त्यांची ओळख आहे. गजानन बरेचदा गंगावेश परिसरात येत असतो. बुधवारी सकाळी नऊ वाजता संबंधित व्यक्ती मुलगा आणि मुलीला घेऊन कणसे विकण्यासाठी गंगावेशमध्ये आली होती. त्यावेळी मुलगी बागेत खेळण्यासाठी हट्ट करत होती. साडेअकराच्या सुमारास गजानन इंगवले तिथे आला आणि मुलीला बागेत घेऊन जातो, असं त्याने सांगितलं.
हेही वाचा : INDIA Meeting : राहुल गांधींसमोरच काँग्रेसच्या भूमिकेवर आक्षेप, उद्धव ठाकरे काय म्हणाले?
