रक्तबंबाळ अवस्थेत 180 प्रवाशांना वाचवणाऱ्या भारतीय वैमानिकासाठी पीएम मोदींची पोस्ट, म्हणाले...

मुंबई तक

captain smit machhar flydubai flight pm modi praises : फ्लायदुबईच्या विमानात हल्ला झाल्यानंतर गंभीर जखमी असूनही कॅप्टन स्मित मच्छार यांनी विमानाची परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या धाडसाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी कौतुक केलं.

ADVERTISEMENT

PM Modi on piolet
PM Modi on piolet
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

रक्तबंबाळ अवस्थेत 180 प्रवाशांना वाचवलं,

point

भारतीय वैमानिकासाठी मोदींची खास पोस्ट

captain smit machhar flydubai flight pm modi praises : फ्लायदुबईच्या FZ1073 विमानात भारतीय कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर ओमानी को-पायलटकडून चाकूने हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी झाल्यानंतरही त्यांनी विमानाची परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅप्टन स्मित मच्छार यांच्या धाडसाचे कौतुक करत त्यांना ‘हिरो’ म्हटलं आहे. त्यांच्या धाडसामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचवण्यास मदत झाली आणि मोठी दुर्घटना टळली, असं मोदी यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : Maharashtra Weather: महाराष्ट्रात 1 ऑक्टोबरला पाऊस की ‘ऑक्टोबर हिट’? IMDचा अंदाज काय?

कॉकपिटचा दरवाजा उघडण्यात यशस्वी झाले अन् 

फ्लायदुबईचं FZ1073 हे विमान दुबईहून तेल अवीवला जात होतं. या विमानात 174 प्रवासी आणि क्रू सदस्य होते. बुधवारी विमान उड्डाणात असताना कॉकपिटमध्ये कॅप्टन आणि को-पायलटमध्ये हिंसक घटना घडली. यावेळी भारतीय कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर त्यांच्या ओमानी को-पायलटने चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात मच्छार गंभीर जखमी झाले. त्यानंतर विमान अचानक वेगाने खाली येऊ लागलं. फ्लाइट ट्रॅकिंग डेटानुसार विमान काही वेळातच हजारो फूट खाली आलं. गंभीर जखमी असूनही मच्छार यांनी परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न सुरू ठेवला. ते कॉकपिटचा दरवाजा उघडण्यात यशस्वी झाले. त्यानंतर प्रवासी आणि क्रू सदस्य कॉकपिटपर्यंत पोहोचले आणि आरोपीला नियंत्रणात घेण्यास मदत केली. विमानातील इतर वैमानिकांनीही नियंत्रण मिळवण्यासाठी मदत केली. त्यानंतर विमान सौदी अरेबियातील तबूक विमानतळावर सुरक्षित उतरवण्यात आलं.

हेही वाचा : Personal Finance: Digital Gold मध्ये लाखो रुपये गुंतवले, पण तुमच्यानंतर हे सोने कुणाला मिळणार?