'अजितदादांच्या घातपात प्रकरणी VSR ला वाचवणारा मफलरवाला नेता राज्यातीलच', रोहित पवारांचा प्रचंड मोठा गौप्यस्फोट
रोहित पवार यांनी स्व. अजित पवार यांच्या अपघातामागे घातपाताची शक्यता व्यक्त करत व्हीएसआर कंपनीच्या मालकाला वाचवणाऱ्या महाराष्ट्रातील एका मोठ्या नेत्याचा दावा केला आहे. या ‘मफलरवाला’ नेत्याचे नाव, फोटो आणि संबंधित पुरावे 10 तारखेला जाहीर करणार असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले आहे.
ADVERTISEMENT

मनीष जोग, जळगाव: स्व. अजित पवार यांच्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी जळगावात मोठा दावा केला आहे. अजित पवारांच्या अपघातामागे घातपाताची शक्यता असल्याचा संशय व्यक्त करत, व्हीएसआर कंपनीच्या मालकाला वाचवणाऱ्या एका मोठ्या नेत्याचा पर्दाफाश करणार असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे, हा नेता केंद्रातील नसून महाराष्ट्रातीलच असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
रोहित पवार सध्या चाळीसगाव तालुक्यातील दुष्काळ आणि पाणी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी अजित पवारांच्या अपघातासंदर्भात हा गंभीर दावा केला. संबंधित नेत्याचे नाव, त्याचा फोटो आणि त्यासंदर्भातील पुरावे आपण समोर आणणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
‘मफलरवाला’ नेता कोण?
रोहित पवार यांनी आपल्या दाव्यात एका ‘मफलरवाला नेत्याचा’ उल्लेख केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, एका कार्यक्रमात एका मोठ्या नेत्याने विशिष्ट प्रकारचा मफलर घातला होता. हा कार्यक्रम नेमका कोणता होता आणि त्यासंदर्भातील माहिती काय आहे, याचा खुलासा आपण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हे ही वाचा>> मिळालेला जामीन गमावला, डॉक्टरला मारहाण करणारे शिंदेंचे नगरसेवक रमेश म्हात्रेंसोबत सुप्रीम कोर्टात काय घडलं? आता पुन्हा तुरुंगात!
रोहित पवार यांच्या दाव्यानुसार, व्हीएसआर कंपनीला आतापर्यंत याच नेत्याने वाचवल्याचा त्यांना संशय आहे. तसेच, अजित पवारांचा अपघात नसून घातपात झाला असावा, असे ज्यांच्याबाबत वाटते, अशा लोकांना जर कोणी वाचवत असेल, तर त्या व्यक्तीचे नावही समोर आणले जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.
