मिळालेला जामीन गमावला, डॉक्टरला मारहाण करणारे शिंदेंचे नगरसेवक रमेश म्हात्रेंसोबत सुप्रीम कोर्टात काय घडलं? आता पुन्हा तुरुंगात!

मिथिलेश गुप्ता

डोंबिवलीतील शास्त्रीनगर हॉस्पिटल मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रे यांना मोठा झटका बसला आहे. सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा जामीन रद्द करत तीन दिवसांत सरेंडर करण्याचे आदेश दिले आहेत.

ADVERTISEMENT

dombivli shastrinagar hospital- doctor nurse assault case shinde shiv sena corporater ramesh mhatre bail cancelled Supreme Court
रमेश म्हात्रे यांना मोठा झटका
Google CTA

डोंबिवली: डोंबिवलीतील शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आणि नर्ससोबत मारहाणीच्या प्रकरणात आरोपी रमेश म्हात्रे यांना सुप्रीम कोर्टाकडून मोठा धक्का बसला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला जामीन सुप्रीम कोर्टाने रद्द केला असून, रमेश म्हात्रे यांना तीन दिवसांच्या आत संबंधित प्राधिकरणासमोर आत्मसमर्पण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आणि नर्ससोबत  मारहाण झाल्याच्या प्रकरणात रमेश म्हात्रे आरोपी आहेत. या प्रकरणात उच्च न्यायालयाने त्यांना काही अटींसह जामीन मंजूर केला होता. हायकोर्टाच्या या निर्णयाला आव्हान देत हे प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचले.

सुप्रीम कोर्टात या प्रकरणावर सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने हायकोर्टाकडून मंजूर करण्यात आलेला जामीन रद्द केला. त्याचबरोबर रमेश म्हात्रे यांना तीन दिवसांच्या आत संबंधित प्राधिकरणासमोर सरेंडर करण्याचे निर्देश दिले आहेत.

नेमकं प्रकरण काय?