नांदेड: माहूर गडावर अपघात, 100 फूट खोल दरीत टेम्पो उलटून तिघांचा अंत

Nanded Accident : नांदेड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र माहूर गडावर नवरात्रोत्सवामुळे रेणुका मातेच्या दर्शनासाठी भाविक भक्तगण जात आहेत. अशातच काही भक्त हे रेणुका मातेचे दर्शन घेत परतत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला.

ADVERTISEMENT

Nanded accident
Nanded accident
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

तिघे जखमी आणि इतर तिघांचा मृत्यू 

point

परतीच्या प्रवासादरम्यान दुर्दैवी घटना 

Nanded Accident : कुवरचंद मंडले - नांदेड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र माहूर गडावर नवरात्रोत्सवामुळे रेणुका मातेच्या दर्शनासाठी भाविक भक्तगण जात आहेत. अशातच काही भक्त हे रेणुका मातेचे दर्शन घेत परतत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. परतीच्या प्रवासादरम्यान भाविकांनी भरलेला टेम्पो केरोळी माहूर घाटाताली एका धोकादायक वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट 100 फुट खोल दरीत कोसळण्याची घटना आहे. ही घटना 16 ऑक्टोबर 2026 रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली. यात तीन भाविकांचा मृत्यू, तर इतर तिघेजण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली. 

हे ही वाचा : नागपूर: फार्महाऊसवर अश्लील डान्स, चार नर्तिका आणि 22 पुरूषांवर कारवाई

तिघे जखमी आणि इतर तिघांचा मृत्यू 

चालक प्रतीक अरविंद अडकिने (वय 26), दत्ता मनोहर मेश्राम (वय 35) आणि यशवंत अरविंद पाटील (वय 25) अशी जखमी झालेल्यांची ओळख समोर आली. तर मृतांची बाबाराम ज्ञानोबा टेकाम (वय 60), राहुल सुधाकरराव ठाकरे (वय 25) आणि प्रीतम रामराव प्रधान (वय 38) हे टेम्पोतून अपघातादरम्यान बाहेर फेकले गेले. ज्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. 

परतीच्या प्रवासादरम्यान दुर्दैवी घटना 

 घडलेल्या घटनेनुसार, यवतमाळ येथील एका फर्निचरजच्या दुकानात काम करणारे सह सहकारी कामगार गुरुवारी 15 ऑक्टोबर रोजी रात्री साडेसहा वाजण्याच्या सुमारास टेम्पोने माहूर गडावर रेणुका देवीच्या दर्शनासाठी निघाले होते. त्यानंतर मध्यरात्री 12 च्या सुमारास माहूर येथे पोहोचून त्यांनी रेणुका मातेचे दर्शन घेतले आणि पूजाअर्चा केली. 

हे ही वाचा : मुंबईत 12 वर्षीय मुलीने 2 वर्षाच्या मुलीला सहाव्या मजल्यावरून ढकललं, आरोपीच्या आईनं..

त्यानंतर भक्त पहाटेच्या पाच वाजण्याच्या सुमारास यवतमाळच्या दिशेने घराकडे परतीच्या प्रवासासाठी कूच केली. मात्र, इतक्यात होत्याचे नव्हते झाले आणि घाटात PWD च्या पहिल्यात वळणावर टेम्पो उलटून तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तसेच इतर तिघे जखमी होते. वाहनाचा वेग आणि हेडलाईटचा थेट प्रकाश हा टेम्पो चालकाच्या तोंडावर आल्याने ही दुर्दैवी घटना घडली होती. याचदरम्यान टेम्पो 100 फूट खोल दरीत कोसळला.