'सभेला गर्दी होते मग मतं कुठे जातात?' ज्ञानेश कुमारांचा दाखला देत राज ठाकरेंचे जोरदार प्रत्युत्तर

मुंबई तक

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. सोशल मीडियात पोस्ट करुन त्यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

ADVERTISEMENT

Raj Thackeray On Election Commission
Raj Thackeray On Election Commission
Google CTA

बातम्या हायलाइट

point

'सभेला गर्दी होते मग मतं कुठे जातात?'

point

ज्ञानेश कुमारांचा दाखला देत राज ठाकरेंचे जोरदार प्रत्युत्तर

Raj Thackeray On Election Commission : भारतीय निवडणूक आयोगात आपसांत मतभेद असल्याचे वृत्त इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राने काल (23 सप्टेंबर) दिले होते. तेव्हापासून देशाचा निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. भारतीय निवडणूक आयोगाने आपापसातील मतभेदांचे वृत्त फेटाळून लावले असले तरी विरोधी पक्षाकडून त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी देखील निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. सोशल मीडियात पोस्ट करुन त्यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच सभेला गर्दी होते, पण मतं कुठे जातात या प्रश्नाचंही उत्तर त्यांनी दिले आहे.

राज ठाकरे यांची पोस्ट जशीच्या तशी

इंडियन एक्स्प्रेस वर्तमानपत्राच्या कालच्या मुख्य पानावरच्या या मथळ्याखालच्या  '14 times in 10 months, two Election Commissioners objected on record to poll panel steps बातमीने देशांत खळबळ उडवून दिली आहे. 2025 च्या अखेरीस, महापालिका निवडणुकांच्या आधी जेंव्हा महाराष्ट्रातील विरोधी पक्षांचे नेते आम्ही राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना भेटायचो तेंव्हाच लक्षात यायचं की यांना कुठलेच अधिकार नाहीत. हे मी जाहीरपणे अनेकदा बोललो आहे, निवडणूक आयोगाच्या कारभारावर मी आणि माझ्या पक्षाने उघडउघड शंका म्हणा आरोप म्हणा काहीही म्हणा, पण ते आम्ही केलेत. आम्ही जे बोलत होतो त्याची सत्यता या बातमीत तुम्हाला सापडेल. 

हे ही वाचा : ज्ञानेश कुमारांनी मोक्कार खेळ केला...(?!)

राज्य निवडणूक आयोग सोडाच जिथे केंद्रीय निवडणूक आयोगातल्या 2 आयुक्तांनाच गुंडाळून ठेवलं आणि त्यांना अंधारात ठेऊन किंवा त्यांच्या मताला अजिबात किंमत न देता जे निर्णय राबवले जात आहेत यावरून एक गोष्ट स्वच्छ आहे निवडणूक आयोग स्वायत्त असायला हवा हे आता पुस्तकापुरतं मर्यादित आहे.  स्वायत्ततेची व्याख्या भारतीय जनता पक्षाच्या अधीन अशी असेल तर तो स्वायत्त आहे, अन्यथा नाही. निवडणूक आयुक्त श्री. सुखबीर सिंग संधू आणि श्री. विवेक जोशी यांनी जे आक्षेप नोंदवलेत ते गंभीर आहेत, ते नाकारणं मुख्य निवडणूक आयुक्तांना म्हणजेच श्री. ज्ञानेश कुमारांना शक्यच नाही, त्यामुळे ते जे वागले यामागचा कर्ताकरविता नक्की कोण होता, आहे इतकं सांगितलं तरी पुरेसं आहे. 

इंडियन एक्स्प्रेसच्या बातमीची लिंक इथे मुद्दामून देतोय. ती प्रत्येक भारतीय नागरिकाने वेळात वेळ काढून वाचाच. तुम्ही मतदान करता, तुम्हाला बदल हवा असतो पण तो बदल कधीच का मिळणार नाही याची उत्तरच या बातमीत सापडतील. श्री. सुखबीर सिंग संधू आणि श्री. विवेक जोशी या दोन निवडणूक आयुक्तांनी गेल्या 10 महिन्यांत 14 वेळा निवडणूक आयोगाच्या कारभारावर ऑन रेकॉर्ड ताशेरे ओढले आणि तरीही ढिम्मपणे निवडणूक आयोगाला जे करायचं होतं तेच त्यांनी केलं.