ज्ञानेश कुमारांनी मोक्कार खेळ केला...(?!)
ECI Controversy : निवडणूक आयोगातील दोन आयुक्तांनी गेल्या 10 महिन्यांत विविध निर्णयांवर 14 वेळा लेखी आक्षेप नोंदवल्याचं समोर आलं आहे. Form 6, SIR आणि मतदार यादीच्या डेटाबेसच्या नियंत्रणाबाबत या आक्षेपांमधून नेमके कोणते प्रश्न उपस्थित झाले, जाणून घ्या.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
ज्ञानेश कुमारांनी मोक्कार खेळ केला...(?!)
दोन आयुक्तांनी गेल्या 10 महिन्यांत विविध निर्णयांवर 14 वेळा लेखी आक्षेप नोंदवल्याचं समोर
देशाभरात निवडणूक आयोगाच्या अंतर्गत मतभेदांची चर्चा सध्या सुरू झाली आहे. ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी गेल्या 10 महिन्यांत आयोगाच्या विविध निर्णयांवर किमान 14 वेळा लेखी आक्षेप नोंदवले आहेत. हे आक्षेप नवीन मतदारांची नोंदणी, मतदारांची नावं वगळणे किंवा पुन्हा समाविष्ट करणे, SIR म्हणजेच Special Intensive Revision, मतदार यादीशी संबंधित अपील आणि मतदारांच्या डिजिटल डेटाबेसच्या प्रवेशाशी संबंधित आहेत. आयोगाच्या कामकाजातील या मतभेदांमुळे निवडणूक प्रक्रियेतील निर्णय कसे घेतले जातात, यावर प्रश्न उपस्थित झाले आहेत. मात्र निवडणूक आयोगाने अंतर्गत फूट असल्याचा दावा नाकारला आहे. आयोगाच्या म्हणण्यानुसार, सूचना, निरीक्षणं आणि वेगवेगळी मतं ही निर्णयप्रक्रियेचा सामान्य भाग आहेत आणि गेल्या वर्षभरातील निर्णय पूर्ण आयोगाच्या एकमताने घेण्यात आले आहेत.
हेही वाचा : ‘ग्यानेश, इट्स डन ब्रो!’ अभिजीत दिपकेंची पोस्ट तुफान चर्चेत; उद्या दिल्लीत मोठा गौप्यस्फोट?
हा बदल अनधिकृत आणि बेकायदेशीर, संधू नेमकं काय म्हणाले?
या वादातील महत्त्वाचा मुद्दा Form 6 शी संबंधित आहे. मतदार म्हणून नाव नोंदवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या Form 6 मध्ये यापूर्वी नसलेली SIRशी संबंधित माहिती विचारण्यात आली. अर्जदाराचं किंवा त्याच्या आई-वडिलांचं अथवा आजी-आजोबांचं नाव मागील SIRच्या मतदार यादीत होतं का, असा प्रश्न या प्रक्रियेत विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय ऑनलाइन अर्ज पुढे करता येत नव्हता. विवेक जोशी यांनी मे महिन्यात या बदलावर आक्षेप घेतला. त्यांच्या म्हणण्यानुसार, Form 6 हा नियमांमध्ये निश्चित केलेला वैधानिक अर्ज असल्याने संबंधित नियमांमध्ये बदल केल्याशिवाय त्यात असा बदल करता येत नाही. सुखबीर सिंह संधू यांनीही या भूमिकेला सहमती दर्शवली. त्यानंतर 13 ऑगस्ट रोजी संधू यांनी हा बदल अनधिकृत आणि बेकायदेशीर असल्याचं नमूद करत तो तातडीने हटवण्याची मागणी केली होती.
हेही वाचा : IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे प्रकरणाला नवं वळण! परीक्षेदरम्यान मोबाईल वापरताना CCTV मध्ये दिसला साहिल
