‘ग्यानेश, इट्स डन ब्रो!’ अभिजीत दिपकेंची पोस्ट तुफान चर्चेत; उद्या दिल्लीत मोठा गौप्यस्फोट?
अभिजीत दिपके यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर टीका करत 24 सप्टेंबरला दिल्लीत पत्रकार परिषद घेण्याची घोषणा केली आहे. निवडणूक आयोगातील कथित मतभेद, SIR प्रक्रिया आणि मतदार याद्यांवरील आरोपांच्या पार्श्वभूमीवर CJPच्या या पत्रकार परिषदेकडे लक्ष लागले आहे.
ADVERTISEMENT

नवी दिल्ली: कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके यांनी आता निवडणूक आयोगाच्या कामकाजावर लक्ष केंद्रित करण्याची घोषणा केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्यावर टीका करत दिपके यांनी गुरुवारी (24 सप्टेंबर) रोजी दिल्लीत महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार असल्याचे X पोस्टद्वारे जाहीर केले आहे. त्यांच्या पोस्टमध्ये,
“Election Commission Thik Karo! Important PC tomorrow in Delhi. Gyanesh, it’s done bro!”
असा मजकूर आहे.
निवडणूक आयोगाच्या कामकाजावर प्रश्न
दिपकेंची ही घोषणा अशा वेळी झाली आहे, जेव्हा निवडणूक आयोगातील दोन आयुक्तांनी काही निर्णयांवर आक्षेप घेतल्याचा दावा करणारा एक अहवाल समोर आला आहे. The Indian Expressच्या वृत्तानुसार, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी गेल्या 10 महिन्यांत आयोगाच्या काही निर्णयांवर किमान 14 वेळा औपचारिक आक्षेप नोंदवले. या आक्षेपांचा संबंध मतदार यादी, मतदार नोंदणी प्रक्रिया आणि Special Intensive Revision (SIR) यांसारख्या मुद्द्यांशी असल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे.
मतदार यादीतील नावांवरून वाद
