IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे प्रकरणाला नवं वळण! परीक्षेदरम्यान मोबाईल वापरताना CCTV मध्ये दिसला साहिल
IIT बॉम्बेचा विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या आत्महत्येच्या प्रकरणात परीक्षा हॉलमधील CCTV फुटेज समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT

IIT Bombay Student Sahil Wakode Case: मुंबई: IIT बॉम्बेचा विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या आत्महत्येच्या प्रकरणात परीक्षा केंद्रातील कथित CCTV फुटेज समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे. या फुटेजमध्ये साहिल मोबाईल वापरताना आणि परीक्षा हॉलमधून प्राध्यापक सूर्य नारायण डुल्ला यांच्यासोबत बाहेर जाताना दिसत असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर साहिलच्या कुटुंबीयांनी केलेले आरोप आणि तपासातील घडामोडींमुळे हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे.
परीक्षा हॉलमधील CCTV फुटेज समोर आल्याचा दावा
IIT बॉम्बेतील विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या आत्महत्येच्या प्रकरणात परीक्षा केंद्रातील CCTV फुटेज समोर आल्याचे वृत्त आहे. ‘आज तक’च्या वृत्तानुसार, या फुटेजमध्ये घटनेच्या काही वेळ आधी परीक्षा हॉलमध्ये काय घडले, याची दृश्ये असल्याचा दावा करण्यात आला आहे.
हे ही वाचा>> 'हे इतकं विषारी होत चाललंय..', साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणावर राज ठाकरेंची पोस्ट
परीक्षा सुरू असताना साहिल मोबाईलचा वापर करत असल्याचे या फुटेजमध्ये दिसत असल्याची माहिती आहे. प्रश्नपत्रिका आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल ChatGPT वर अपलोड करून उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही या प्रकरणात करण्यात आला आहे.
प्राध्यापकांनी मोबाईल पाहिला, विद्यार्थ्याला बाहेर नेलं
या प्रकरणातील आरोपांनुसार, परीक्षा हॉलमध्ये ड्युटीवर असलेले प्राध्यापक सूर्य नारायण डुल्ला यांचे साहिलकडे लक्ष गेले. त्यानंतर ते साहिलजवळ गेले आणि त्याचा मोबाईल पाहिल्यानंतर त्याला जागेवरून उठण्यास सांगितले.
