Govt Jobs : भारत सरकारच्या कंपनीत नोकरीची संधी, ट्रेनिंगमध्येच मिळणार 50 हजार रुपये पगार
भारत सरकारच्या नवरत्न दर्जा असलेल्या कंपनीत पदवीधर कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 डिसेंबर आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
भारत सरकारच्या कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी
काय आहेत पात्रतेचे निकष?
जाणून घ्या सविस्तर
NLCIL Recruitment 2026 : नवरत्न दर्जा असलेल्या एनएलसी इंडिया लिमिटेड (NLCIL) या भारत सरकारच्या कंपनीत भरती जाहीर करण्यात आली आहे. याअंतर्गत 'पदवीधर कार्यकारी प्रशिक्षणार्थी' (Graduate Executive Trainee - GET) पदांच्या एकूण 143 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीअंतर्गत मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल आणि मायनिंग या अभियांत्रिकी शाखांमधील उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
शैक्षणिक पात्रता काय?
या पदांसाठी संबंधित अभियांत्रिकी शाखेतील पदवी (B.E./B.Tech) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सामान्य (UR), EWS आणि OBC-NCL वर्गवारीतील उमेदवारांसाठी किमान 60% गुण, तर SC/ST उमेदवारांसाठी किमान 50% गुण असणे अनिवार्य आहे. यासोबतच उमेदवार GATE 2025 परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 1 नोव्हेंबर 2026 या पात्रता दिनानुसार उमेदवाराची कमाल वयोमर्यादा वर्गवारीनुसार 30, 33 किंवा 35 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. निवड झालेल्या उमेदवारांना 3 लाख रुपयांचा सर्व्हिस ॲग्रीमेंट बाँड पूर्ण करावा लागेल आणि त्यांची नियुक्ती भारतातील विविध NLCIL युनिट्स व प्रोजेक्ट्समध्ये केली जाईल.
हे ही वाचा : तारीख अन् वेळ ठरली, गोकुळसाठी आता रस्त्यावरची लढाई; सरकारच्या निर्णयाविरोधात सतेज पाटलांचा संघर्षमोर्चा
अर्जाची अंतिम तारीख
उमेदवारांची निवड ही GATE 2025 मधील गुण आणि वैयक्तिक मुलाखत (Personal Interview) यांच्या आधारे केली जाईल. या भरतीसाठी अर्ज शुल्क म्हणून UR/EWS/OBC-NCL उमेदवारांना 854 रुपये तर SC/ST/PwBD उमेदवारांना 354 रुपये भरावे लागतील. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 13 नोव्हेंबर 2026 पासून सुरू होणार असून नोंदणीची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2026 आहे.
हे ही वाचा : चंद्रपूर : अल्पवयीन मुलीला घरासमोर बोलवून लैंगिक अत्याचार, भाजपच्या मंडल अध्यक्षावर गुन्हा
पगार किती मिळणार?
निवड झालेल्या उमेदवारांना 1 वर्षाच्या प्रशिक्षण कालावधीदरम्यान दरमहा 50,000 रुपये मूळ वेतन मिळेल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना अंदाजे 14.50 लाख रुपये वार्षिक CTC दिला जाईल. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. भरतीबाबत अधिक माहिती, अधिकृत अधिसूचना आणि ऑनलाईन अर्जासाठी उमेदवारांनी NLCIL च्या अधिकृत संकेतस्थळाला (www.nlcindia.in) भेट द्यावी.
