Personal Finance: SBI ते HDFC बँकेपर्यंत, सर्वात स्वस्त Home Loan कुठे मिळेल? व्याजदर आणि EMI सगळंच घ्या पाहून!

Home Loan Interest Rate: जर तुम्ही घर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही योग्य वेळ असू शकते. कारण टॉप 10 बँकांमध्ये 20 वर्षांच्या 50 लाख रुपयांच्या गृहकर्जावरील व्याजदर सध्या 7.3 टक्के ते 9 टक्के याच्या दरम्यान आहे. जाणून घ्या सध्याच्या घडीला कोणत्या बँका सर्वोत्तम व्याजदर देत आहेत.

ADVERTISEMENT

personal finance from sbi to hdfc bank where to get the cheapest home loan take a look at interest rate and emi
पर्सनल फायनान्स टिप्स
social share
google news

Personal Finance Tips for Home Loan Interest Rate: घर खरेदी करणे हे एक मोठे स्वप्न असतं आणि परवडणाऱ्या व्याजदराने गृहकर्ज घेतल्याने तुमचे लाखो रुपये वाचू शकतात. सणासुदीचा हंगाम जवळ आला आहे आणि बँका आणि वित्तीय संस्था गृहकर्जांवर आकर्षक ऑफर देत आहेत. आम्ही तुम्हाला सांगत आहोत की, कोणत्या बँका सर्वोत्तम व्याजदर देत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, 9 सप्टेंबरपर्यंत, 50 लाख रुपयांच्या 20 वर्षांच्या गृहकर्जावरील व्याजदर 7.3 टक्के ते 9 टक्के आहेत. हे दर तुमच्या क्रेडिट स्कोअर आणि उत्पन्न कर यासारख्या घटकांवर अवलंबून असतात. RBI च्या आकडेवारीच्या आधारे या यादीत टॉप बँकांचा समावेश करण्यात आला आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे व्याजदर

कॅनरा बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया- सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये, कॅनरा बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया सर्वात कमी गृहकर्ज व्याजदर देत आहेत. व्याजदर 7.3 टक्क्यांपासून सुरू होतो आणि 50 लाख रुपयांच्या 20 वर्षांच्या कर्जावरील EMI सुमारे 39,670 रुपये आहे.

बँक ऑफ बडोदा- बँक ऑफ बडोदाचे गृहकर्ज 7.45 टक्के व्याजदरापासून सुरू होते. 50 लाख रुपयांच्या 20 वर्षांच्या कर्जावरील EMI 40,127 रुपये असेल.

SBI आणि PNB- स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँक 7.5 टक्के सुरुवातीच्या दराने कर्ज देत आहेत. 20 वर्षांसाठी 50 लाख रुपयांच्या कर्जावरील EMI 40,280 रुपये असेल.

खाजगी बँकांचे व्याजदर

ICICI बँक- आयसीआयसीआय बँक 7.7 टक्के व्याजदराने गृहकर्ज देते. 50 लाख रुपयांच्या 20 वर्षांच्या कर्जावरील EMI 40,893 रुपये असेल.

HDFC बँक- खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेचा व्याजदर 7.9 टक्क्यांपासून सुरू होतो. 50 लाख रुपयांच्या 20 वर्षांच्या कर्जावरील EMI 41,511 रुपये असेल.

कोटक महिंद्रा बँक- कोटक महिंद्रा बँकेचे गृहकर्ज 7.99 टक्के व्याजदरापासून सुरू होते. 50 लाख रुपयांच्या 20 वर्षांच्या कर्जावरील EMI 41,791 रुपये असेल.

अ‍ॅक्सिस बँक- अ‍ॅक्सिस बँक 8.35 टक्के व्याजदराने गृहकर्ज देत आहे. बँकेत 50 लाख रुपयांच्या 20 वर्षांच्या कर्जावरील EMI 42,918 रुपये असेल.

येस बँक- येस बँकेचा व्याजदर 9 टक्के आहे. बँकेत 50 लाख रुपयांच्या 20 वर्षांच्या कर्जावरील EMI 44,986 रुपये असेल.

Personal Finance सीरीजमधील या बातम्याही वाचा:

1. Personal Finance: पेन्शनबाबत येऊ शकते एक मोठी आणि चांगली बातमी, आतापासूनच सगळा प्लॅन ठरवून ठेवा!

2. Personal Finance: 50 व्या वर्षीच व्हा निवृत्त, तरीही मिळेल दर महिन्याला 1 लाख रूपये.. SWP प्लॅन आहे तरी काय?

3. Personal Finance: तुमच्या मुलाच्या जन्मापासून SIP करा सुरू, मिळतील 1 कोटी.. 21x10x12 फॉर्म्युला आहे जबरदस्त

4. Personal Finance: घर खरेदी करावं की भाड्याने घ्यावं.. काय चूक, काय बरोबर? 'हा' फॉर्म्युला ठेवा लक्षात?

5. Personal Finance तुम्हाला मिळतील 4 कोटी, फक्त SNP हा प्लॅन ठेवा लक्षात.. हाती येईल प्रचंड पैसा!

6. Personal Finance: FD पेक्षा जास्त मिळतील पैसे, 'ही' जबरदस्त योजना तुम्हाला माहिती आहे का?

7. Personal Finance: जर तुम्हाला घरबसल्या PF चे पैसे हवे तर फक्त 'एवढंच' करा.., थेट तुमच्या खात्यात पैसे

8. गुड न्यूज: तुमचा घराचा हप्ता होणार कमी, EMI भरताना 'एवढे' पैसे वाचणार!

9. Personal Finance: शेअर मार्केटचा बाजारच उठला, आता करावं तरी काय?

10. Personal Finance: ATM वापरलं की, तुमचे पैसे कापले जाणार, 1 मे पासून येणार नियम पाहून ठेवा बरं!

11. Personal Finance: 50,000 रुपये पगार असलेली लोकंही बनू शकतात करोडपती, फक्त 300...

12. Personal Finance: EPFO कडून मोठा दिलासा, PF मधून काढता येणार 5 लाख... तेही थेट UPI आणि ATM वापरून!

13. Personal Finance: 500 रुपयांच्या मासिक SIP ने किती दिवसांत होऊ शकता कोट्यधीश? संपूर्ण गणित घ्या समजून

14. SIP सारखी जबरदस्त कमाई आणि FD सारखे दर महिन्याला पैसे, SWP प्लॅन नेमका काय?

15. Personal Finance: गुंतवणुकीवर किती पैसे मिळणार हे सत्य कोणीही सांगत नाही, 70 चा फॉर्म्युला तुम्हाला टाकेल हादरवून!

16. Personal Finance: LIC ची रक्कम किती असावी? 'हा' फॉर्म्युला खूप फायदेशीर

हे वाचलं का?

    follow whatsapp