राज्यात उष्णतेचा पारा वाढला, 'हा' जिल्हा अधिक तापणार, हवामान विभागाचा महत्त्वाचा अलर्ट

मुंबई तक

Maharashtra Weather : राज्यात उष्णतेचा पारा वाढलेला आहे, पण त्यात आणखी वाढ होण्याी शक्यता आहे. 3 मार्च रोजी धुलिवंदनाच्या रोजी हवामान हे उष्ण आणि कोरडे राहण्याची शक्यता आहे. राज्यातील तापमानात 3 ते 4 अंशांनी तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. अशातच जाणून घेऊयात 3 मार्च रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज. 

ADVERTISEMENT

maharashtra weather
maharashtra weather
social share
google news

बातम्या हायलाइट

point

राज्यात उष्णतेचा पारा वाढला

point

3 मार्च रोजी हवामान हे उष्ण आणि कोरडे राहण्याची शक्यता

Maharashtra Weather : राज्यात उष्णतेचा पारा वाढलेला असून त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. 3 मार्च रोजी धुलिवंदनाच्या रोजी हवामान हे उष्ण आणि कोरडे राहण्याची शक्यता आहे. राज्यातील तापमानात 3 ते 4 अंशांनी तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. अशातच जाणून घेऊयात 3 मार्च रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज. 

हे ही वाचा : रात्री मोबाईलवरून झाला वाद, उडी मारत महिलेनं जीवन संपवल्याचा संशय, अंगणात आढळला मृतदेह

कोकण : कोकण विभागातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात हवामान उष्ण आणि दमट राहील. तसेच हवेची आर्द्रता अधिक असल्याने उकाडा तीव्र जाणवण्याची शक्यता आहे. 

पश्चिम महाराष्ट्र : पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली कोल्हापूरमध्ये उष्ण आणि कोरडे हवामान राहील असा अंदाज आहे. तसेच पुण्यात देखील अशीच स्थिती आहे. 

मराठवाडा : विभागातील छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, नांदेड, परभणी आणि धाराशिवमध्ये उष्ण आणि कोरड्या हवामानाचा अंदाज राहील. कमाल तापमान हे 33-36 अंश, तर किमान तापमान हे 19-22 अंश राहण्याची अधिक शक्यता आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp