रात्री मोबाईलवरून झाला वाद, उडी मारत महिलेनं जीवन संपवल्याचा संशय, अंगणात आढळला मृतदेह

मुंबई तक

Crime News : सोमवारी सकाळी काजलखेडी भागात एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली पोलिसांनी सांगितले की, महिलेनं दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली असावी, परंतु घटनेची अधिकृत पुष्टी केल्यानंतर शवविच्छेदन अहवाल अद्यापही समोर आलेला नाही अशी माहिती आहे. दरम्यान असे म्हटलं जातंय की, त्या रात्री मोबाईल फोन वापरण्यावरून जोडप्यांमध्ये वाद झाला होता, यातूनच ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. 

ADVERTISEMENT

crime news
crime news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सोनमने दुसऱ्या मजल्यावरून उडी मारत जीवन संपवलं

point

पती-पत्नीत यापूर्वी मोबाईल फोनवरून वाद

Crime News : भोपाळमध्ये सोमवारी सकाळी काजलखेडी भागात एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली पोलिसांनी सांगितले की, महिलेनं दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली असावी, परंतु घटनेची अधिकृत पुष्टी केल्यानंतर शवविच्छेदन अहवाल अद्यापही समोर आलेला नाही अशी माहिती आहे. दरम्यान असे म्हटलं जातंय की, त्या रात्री मोबाईल फोन वापरण्यावरून जोडप्यांमध्ये वाद झाला होता, यातूनच ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. 

हे ही वाचा : विवाहित महिलेला अश्लील व्हिडिओ दाखवायचा पंकज, तिनं तरुणाला भेटायला बोलावले अन्...

सोनमने दुसऱ्या मजल्यावरून उडी मारत जीवन संपवलं

पोलीस ठाण्याचे प्रभारी पल्लवी पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे नाव सोनम प्रजापती असे आहे, ती तिच्या पतीसोबत देव ग्रीन सिटीमध्ये राहत होती. त्यांना तीन मुले देखील आहेत. प्राथमिक तपासातून समोर आले की, सोनमने दुसऱ्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केल्याचं समोर आले. 

पती-पत्नीत यापूर्वी मोबाईल फोनवरून वाद

पतीच्या जबाबानुसार, रविवारी रात्री पती आणि त्याच्या पत्नीमध्ये मोठा वाद झाला होता. पतीने सांगितले की, त्याच्या पत्नीने वारंवार फोनची मागणी केली, पण त्याने नकार देत तो झोपला. प्राथमिक तपासातून समोर आले की, पती-पत्नीत यापूर्वी मोबाईल फोनवरून वाद झाला होता. दुसऱ्याच दिवशी सोमवारी सकाळी पत्नीचा मृतदेह घराबाहेर आढळला होता. 

हे ही वाचा : 23 वर्षीय तरुण होळी खेळण्यासाठी घराबाहेर पडला, पुन्हा घरी परतला नाही, विहिरीत बॉडी...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे जोडपे मूळचे जबलपूरचे रहिवासी होते आण गेल्या अनेक वर्षांपासून भोपाळमध्ये राहत होते. सध्या कुटुंब आणि शेजारी राहणाऱ्या लोकांचे देखील जबाब नोंदवण्यात आले. मृत्यूचे कारण जाणून घेण्यासाठी शवविच्छेदन अहवालाची वाट पाहिली जातेय.  
 

हे वाचलं का?

    follow whatsapp