Maharashtra weather : राज्यात 'या' जिल्ह्यांत वरुणराजाचा हाहाकार, IMD चा मोठा अलर्ट
Maharashtra weather : राज्यात ठिकठिकाणी वातावरणात बदल झालेला दिसून येतो. कुठे हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असून काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. अशातच जाणून घ्या 31 जुलै 2026 रोजी राज्यातील एकूण हवामानाची शक्यता.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता
कुठे रेड, तर कुठे ऑरेंज तर काही भागांत पावसाचा यलो अलर्ट
Maharashtra Weather : राज्यात ठिकठिकाणी वातावरणात बदल झालेला दिसून येतो. कुठे हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असून काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज तर काही ठिकाणी पावसाचा यलो अलर्टचा अंदाज वर्तविण्या आलाय. अशातच जाणून घ्या 31 जुलै 2026 रोजी राज्यातील एकूण हवामानाची शक्यता पुढीलप्रमाणे वर्तवण्यात आली.
हे ही वाचा : फलटणमधील डॉक्टरची कथित सुसाईड नोट व्हायरल, भाजप नेत्याचं नाव घेत गंभीर आरोप
कोकण
कोकण विभागातील पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांत पावसाचा ऑरेंज अलर्टचा अंदाज आहे. मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्टची शक्यता वर्तविण्यात आलीये.
उत्तर महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, जळगव, नाशिक या जिल्ह्यांत पावसाचा ऑरेंज अलर्टचा अंदाज वर्तवण्यात आलाय. नाशिक घटमाथा परिसरात पावसाचा रेड अलर्टची शक्यता वर्तविली आहे. अहिल्यानगरमध्ये पावसाचा यलो अलर्टची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्रातील पुण्यात मध्यम पावसाची शक्यता वर्तविण्यात आली. पुणे घाटमाथा परिसरात पावसाचा रेड अलर्ट आहे. कोल्हापूर घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाचा यलो अलर्टचा अंदाज आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूरमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. सातारा घाटमाथा परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्टचा अंदाज आहे.
