गर्लफ्रेंडपासून दूर होणं तरुणाला सहन झालं नाही, प्रियकराने हॉटेलमध्ये गळफास घेत संपवलं जीवन
Crime News : प्रेयसीपासून विभक्त होऊन व्यथित तरुणाने एका हॉटेलच्या खोलीतील पंख्याला गळफास लावून तरूणाने जीवन संपवलं. पोलिसांनी सांगितलं की, त्याने एक सुसाईड नोट लिहून त्यात कुटुंबीयांची माफी देखील मागितली. प्रेयसीला आत्महत्येची माहिती द्यावी असं त्या सुसाईड नोटमध्ये नमूद केलं होतं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
तरुणाने गळफास घेत संपवलं जीवन
सुसाईड नोटमध्ये काय?
Crime News : प्रेयसीपासून विभक्त होऊन व्यथित तरुणाने एका हॉटेलच्या खोलीतील पंख्याला गळफास लावून तरूणाने जीवन संपवलं. पोलिसांनी सांगितलं की, त्याने एक सुसाईड नोट लिहून त्यात कुटुंबीयांची माफी देखील मागितली. प्रेयसीला आत्महत्येची माहिती द्यावी असं त्या सुसाईड नोटमध्ये नमूद केलं होतं. मंगळवारी रात्री 11:09 वाजता एका हॉटेलमधून फोन आला की, एका पाहुण्याने खोलीत गळफास घेत जीवन संपवलं. ही घटना दिल्लीच्या नांगलेई मेट्रो स्थानकाजवळील एका हॉटेलात घडली.
हे ही वाचा : मैत्रिणीच्या पार्टीत महिलेवर लैंगिक अत्याचार, एक्स बॉयफ्रेंडकडून 'तसले' व्हिडिओ शेअर करण्याची धमकी
मृत व्यक्ती ही शकूपूरचा रहिवासी असून तो पीतमपुरा येथील एका कंपनीत नोकरी करत होता. पोलिसांच्या माहितीनुसार, त्याने सकाळी 11:30 वाजताच्या सुमारास खोली बुक करून ठेवली होती. हॉटेल कर्मचाऱ्यांना त्यांनी सांगितलं की, सायंकाळी 7 वाजेपर्यंत निघून जाईल. सूत्रांच्या माहितीनुसार, जेव्हा खोली रिकामी न मिळाल्याने हॉटेल कर्मचाऱ्यांनी दरवाजा ठोठावला होता.
सुसाईड नोटमध्ये काय?
कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी अतिरिक्त चावीने खोली उघडली आणि तो तरुण चादरीने छताच्या पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. सूत्रांच्या माहितीनुसार, खोलीतून हस्तलिखित पत्र आढळून आले होते. ज्यात त्याने कुटुंबीची माफी मागितली. मी प्रेयसीशिवाय जगू शकत नाही. अंत्यसंस्कारापूर्वी संबंधित तरुणीला त्याच्या मृत्यूची बातमी कळवावी, अशी माहिती नमूद करण्यात आली.
हे ही वाचा : बायकोची हत्या करत भांगेत भरलं सिंदुर, नवरा पंख्याला लटकला
तपासणीनंतर पोलिसांनी बाथरूममध्ये रक्ताचे डाग आणि तरुणाच्या डाव्या मनगटावर किरकोळ जखमा आढळून आल्या होत्या. ज्यावरून लक्षात येते की, त्याने गळफास घेण्यापूर्वी मनगट कापून जीवन संपवलं होतं.
