मैत्रिणीच्या पार्टीत महिलेवर लैंगिक अत्याचार, एक्स बॉयफ्रेंडकडून 'तसले' व्हिडिओ शेअर करण्याची धमकी

मुंबई तक

Crime News : वाढदिवसाच्या पार्टीत सामील झालेल्या एका महिलेवर दोन मित्रांनी मिळून तिच्यावर अत्याचार केला होता. आरोपींनी महिला दारूच्या नशेत असल्याचं पाहून असं हैवानी कृत्य केलं.

ADVERTISEMENT

crime news
crime news
Google CTA

बातम्या हायलाइट

point

मैत्रिणीच्या पार्टीत गेलेल्या महिलेचं लैंगिक शोषण 

point

एक्स बॉयफ्रेंड अश्लील फोटो पाठवून ब्लॅकमेल करू लागला

Crime News : वाढदिवसाच्या पार्टीत सामील झालेल्या एका महिलेवर दोन मित्रांनी मिळून तिच्यावर अत्याचार केला होता. आरोपींनी महिला दारूच्या नशेत असल्याचं पाहून असं हैवानी कृत्य केलं. 24 जुलै रोजी ही घटना घडली असून महिलेनं पोलीस ठाण्यात तक्रार केली. या प्रकरणात पोलिसांनी पुढील तपास सुरू ठेवला आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. ही घटना गाझियाबाद येथील इंदिरापुरम परिसरात धक्कादायक प्रकार घडला. 

हे ही वाचा : बायकोची हत्या करत भांगेत भरलं सिंदुर, नवरा पंख्याला लटकला

मैत्रिणीच्या पार्टीत गेलेल्या महिलेचं लैंगिक शोषण 

पीडित महिला ही खो़डा ठाणे क्षेत्रातील रहिवासी होती. 24 जुलै रोजी महिला आपल्या मैत्रिणीच्या जन्मदिवसाच्या पार्टीत गेली होती. पार्टीत तीन अन्य तरुण देखील होते. पीडितेनं पोलिसांनी सांगितलं की, केक कापल्यानंतर पीडितेनं बीयर प्यायली. यानंतर तिला नशा चढली होती. संबंधित प्रकरणात असा आरोप करण्यात आला की, पार्टीत हजर असलेल्या एका सुमित नावाच्या तरुणाने पीडिता नशेत असल्याचा गैरफायदा घेत तिच्यावर अत्याचार केला. 

एक्स बॉयफ्रेंड अश्लील फोटो पाठवून ब्लॅकमेल करू लागला

एसीपी इंदिरापुरम सूर्यबलपी मौर्या यांनी सांगितलं की, पीडितेनं 27 जुलै रोजी पतीसोबत ठाण्यात गेली. पोलिसांनी तक्रार दाखल करत आरोपीला अटक केली आहे. गाझियाबाद खोडा ठाणे क्षेत्रातील रहिवासी महिलेला तिचा एक्स बॉयफ्रेंड तिचे अश्लील फोटो पाठवून तिला अनेकदा ब्लॅकमेल करू लागला होता.

हे ही वाचा : AI च्या मदतीने लिहिली तिहेरी हत्याकांडाची स्क्रिप्ट, लिव्ह-इन पार्टनरच्या मदतीने रचला कट, हादरवणारी कहाणी

पीडितेनं पोलिसांनी सांगितलं की, लग्नापूर्वी तिचे तरुणासोबत प्रेमसंबंध होते. लग्नानंतर पीडितेनं आरोपी उवेशसोबत बोलणं बंद केलं. मात्र, त्याने अनेकदा तिला भेटण्यासाठी दबाव आणू लागला होता. पीडित महिलेनं आरोप केला की, जुने फोटो व्हायरल करण्याची तो धमकी देऊ लागला होता.