AI च्या मदतीने लिहिली तिहेरी हत्याकांडाची स्क्रिप्ट, लिव्ह-इन पार्टनरच्या मदतीने रचला कट, हादरवणारी कहाणी
Bengaluru triple murder case : बंगळुरूमधील तिहेरी हत्याकांडात आरोपींनी हत्या करण्यापासून पुरावे नष्ट करण्यापर्यंत AI ची मदत घेतल्याचा तपासात दावा समोर आला आहे. या प्रकरणामुळे गुन्हेगारीत AI च्या वापराबाबत नवा प्रश्न निर्माण झाला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
AI च्या मदतीने लिहिली तिहेरी हत्याकांडाची स्क्रिप्ट
लिव्ह-इन पार्टनरच्या मदतीने रचला कट, हादरवणारी कहाणी
Bengaluru triple murder case : बंगळुरूमधील केआर पुरम परिसरातील साई ग्रीन होम अपार्टमेंटमध्ये घडलेल्या तिहेरी हत्याकांडाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. या प्रकरणात 24 वर्षीय श्वेता हिने तिचा लिव्ह-इन पार्टनर 25 वर्षीय केनेथच्या मदतीने स्वतःचे आई-वडील आणि लहान बहिणीची निर्घृण हत्या केल्याचा आरोप आहे.
हेही वाचा : लेक 40 दिवसांनी आला, मिठी मारत रडले, धमक्या, भीती सांगितली, अभिजीतलाही रडू आलं
हत्येची योजना अन् पुरावे नष्ट करण्यासाठी AI चा वापर
तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, या दोघांनी केवळ हत्येची योजना आखण्यासाठीच नव्हे, तर पुरावे नष्ट करण्याच्या पद्धती जाणून घेण्यासाठीही कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI चा वापर केला होता. त्यामुळे तपास यंत्रणांसमोर गुन्हेगारीत AI च्या वापराबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. 22 जून रोजी घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, हत्या करून बाहेर पडताना श्वेता आणि केनेथ शांतपणे चालत असल्याचे दिसून आले. त्या वेळी त्यांनी नुकतीच तिहेरी हत्या केल्याचा कोणालाही संशय येण्यासारखी कोणतीही हालचाल त्यांच्या वर्तनात दिसत नव्हती.
हेही वाचा : तुफान व्हायरल इरफान जेव्हा राजदीप सरदेसाईंना भेटला... जबरदस्त मुलाखत
