तुफान व्हायरल इरफान जेव्हा राजदीप सरदेसाईंना भेटला... जबरदस्त मुलाखत

मुंबई तक

mohammad irfan exclusive interview : जंतरमंतर आंदोलनामुळे चर्चेत आलेल्या मोहम्मद इरफान यांनी ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांना दिलेल्या विशेष मुलाखतीत लोकशाही, मजूर, शिक्षण आणि नीट पेपर लीकसह विविध मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. राहुल गांधींसोबत झालेल्या भेटीबाबतही त्यांनी सविस्तर भाष्य केले.

ADVERTISEMENT

mohammad irfan exclusive interview
mohammad irfan exclusive interview
Google CTA

बातम्या हायलाइट

point

तुफान व्हायरल इरफान जेव्हा राजदीप सरदेसाईंना भेटला

point

... जबरदस्त मुलाखत पाहाच

mohammad irfan exclusive interview : जंतरमंतरवरील विद्यार्थी आंदोलनादरम्यान देशभर चर्चेत आलेले मोहम्मद इरफान यांनी ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांना दिलेल्या विशेष मुलाखतीत स्वतःला कोणताही 'हिरो' मानण्यास नकार दिला. आंदोलनानंतर राहुल गांधी यांनी त्यांची भेट घेतल्यामुळे त्यांचे नाव चर्चेत आले असले, तरी आपण केवळ कष्टकरी आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राहुल गांधींसोबतच्या भेटीत देशभरातील कामगारांसाठी समान किमान वेतन लागू करण्याची मागणी आपण मांडल्याचे त्यांनी सांगितले. 

देशातील 90 टक्के असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा आणि सन्मानजनक वेतन मिळत नसल्याची खंत व्यक्त करत, प्रत्येक कामगाराला किमान उत्पन्नाची हमी मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. सरकारने याबाबत ठोस धोरण आखून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा : पार्थ पवार आणि कायनात दारा यांचा साखरपुडा संपन्न, पुण्यातील समारंभाला दिग्गजांची उपस्थिती

'अन्यायाविरोधात निर्भयपणे प्रश्न विचारू शकला पाहिजे'

मुलाखतीत इरफान यांनी जंतरमंतर आंदोलनातील अनुभव आणि लोकशाहीबाबतची आपली भूमिका सविस्तर मांडली. त्यांच्या मते, लोकशाही म्हणजे शेवटच्या टप्प्यावर उभा असलेला नागरिक अन्यायाविरोधात निर्भयपणे प्रश्न विचारू शकला पाहिजे. मतभेद असणे हे लोकशाहीचे वैशिष्ट्य असून, असहमती व्यक्त करणाऱ्यांना देशविरोधी ठरवू नये, असे ते म्हणाले. संवादातून मतभेद दूर करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. नीट परीक्षेतील पेपर लीकच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी खेळ होऊ नये, असे सांगितले. गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांतील विद्यार्थ्यांसाठी नीट ही केवळ परीक्षा नसून डॉक्टर होण्याच्या स्वप्नाचा मार्ग असल्याचे त्यांनी नमूद केले. पेपर लीकमुळे विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. आंदोलनादरम्यान काही विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर व्यक्त केलेल्या आक्षेपार्ह भाषेचे समर्थन आपण करत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.