तीन मुली अन् बायको, सगळ्यांना एका रात्रीतच संपवलं, नेमकं कारण काय?

मुंबई तक

जयपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका नराधमाने आपली बायको आणि तीन मुलींची दगडाने ठेचून हत्या केली. कौटुंबिक वादातून ही हत्या केल्याचे बोलले जात आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

तीन मुली अन् बायको

point

सगळ्यांना एका रात्रीतच संपवलं

point

नेमकं कारण काय?

Crime News : जयपुरमधील करधनी भागातील गोविंद वाटिका परिसरात शुक्रवारी सकाळी एक सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. घरात सर्वजण गाढ झोपेत असताना राहुल झा नावाच्या व्यक्तीने राहत्या घरी स्वतःची पत्नी गीता झा (वय 43) आणि तीन मुली नंदिनी (23), राधिका (18) व गौरी (14) यांची डोक्यात जड दगडाने प्रहार करून अत्यंत क्रूरपणे हत्या केली. शुक्रवारी (11 सप्टेंबर) सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. पहिल्या मजल्यावरील खोलीत पत्नीचा, तर तळमजल्यावरील दोन वेगवेगळ्या खोल्यांमध्ये तीन मुलींचे रक्ताने माखलेले मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

एका बाजूला मृतदेह, दुसरीकडे चहा

या हत्येमागील सर्वात हैराण करणारी बाब म्हणजे या भयंकर गुन्ह्यानंतरही आरोपी राहुलचे वर्तन अत्यंत सामान्य होते. रात्री चौघांची निर्घृण हत्या केल्यानंतर, आरोपीने सकाळी 7 वाजता नेहमीप्रमाणे दूध विकत घेतले. त्यानंतर घरी येऊन आपल्या वृद्ध वडिलांसाठी चहा बनवला, त्यांना चहा पाजला आणि त्यानंतर तो गपचूप घरातून पसार झाला. एका बाजूला चार मृतदेह पडून असताना दुसरीकडे आरोपीने शांतपणे चहा बनवून वडिलांना देणे, या प्रकारामुळे पोलिसांनाही मोठा धक्का बसला आहे.

हे ही वाचा : Govt Jobs : भारतीय रेल्वेमध्ये विविध पदांसाठी भरती, लगेच करा अर्ज

कुटुंबासमोरील आर्थिक अडचणी

प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी राहुल झा हा शेअर ट्रेडिंगचे काम करायचा आणि काही दिवसांपूर्वीच तो गुजरातवरून जयपुरला परतला होता. त्याची पत्नी पहिल्या मजल्यावर बुटीक चालवायची, तर मोठी मुलगी नंदिनी शिक्षणासोबत खाजगी नोकरी करत होती. हत्येच्या तीन दिवसांपूर्वी राहुलने शेजाऱ्यांकडून 25 हजार रुपये उसने घेतल्याचे समोर आले असून, तो मोठ्या आर्थिक अडचणीत होता की कौटुंबिक वादातून हे कृत्य घडले, याचा तपास आता पोलीस करत आहेत.

हे ही वाचा : अतिरेकी धमक्यांना न जुमानता काश्मीरमध्ये साजरा होणार गणेशोत्सव

पोलिसांनी काय सांगितले?

डीसीपी वेस्ट प्रशांत किरण यांच्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी चौघीही गाढ झोपेत असताना त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला आहे. सर्व मृतदेहांच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर गंभीर दुखापतींच्या निशाण्या असून घटनास्थळावरून रक्ताने माखलेला दगड जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला असून फरार आरोपी राहुल झाचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.