Maharashtra Weather : गणेशोत्सवाच्या आगमनादिवशी वरुणराजाची दमदार हजेरी, IMD चा अलर्ट
Maharashtra Weather : राज्यात काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली होती, मात्र आता पावसाने दमदार हजेरी लावली आहे. कोकण विभागात पावसाने गणेशोत्सवातच आपली हजेरी लावली. काही ठिकाणी मुसळधार पावसाचा यलो हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. अशातच जाणून घ्या 14 सप्टेंबर 2026 गणेशोत्सव दिनी हवामानाचा एकूण अंदाज.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली
गणेशोत्सव दिनी हवामानाचा एकूण अंदाज
Maharashtra Weather : राज्यात काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली होती, मात्र आता पावसाने दमदार हजेरी लावली आहे. कोकण विभागात पावसाने गणेशोत्सवातच आपली हजेरी लावली. काही ठिकाणी मुसळधार पावसाचा यलो हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर काही ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात येते. अशातच जाणून घ्या 14 सप्टेंबर 2026 गणेशोत्सव दिनी हवामानाचा एकूण अंदाज.
हे ही वाचा : मुंबईत सहा मांजरांसह एका पिल्लाला संपवलं, विखुरलेले आढळले मृतदेह
कोकण
कोकणातील पालघर आणि ठाणे जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्टचा अंदाज वर्तविलेला आहे. तर मुंबई आणि रायगड जिल्ह्यांत मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवविलेली आहे. रत्नागिरीत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. अहिल्यानगर येथे विजांसह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्रात पुण्यात विजांसह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. पुणे घाटमाथा आणि सातारा घाटमाथा परिसरात मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर घाटमाथा परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांत हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
