मुंबईत सहा मांजरांसह एका पिल्लाला संपवलं, विखुरलेले आढळले मृतदेह
Mumbai crime : मुंबईतील चेंबूर येथून प्राणी प्रेमी आणि स्थानिकांना मोठा धक्का बसला आहे. पांजरापोला परिसरात एका इसमाने 6 मांजरी आणि एका मांजरीचे मृत पिल्लू आढळून आले होते. या घटनेनंतर परिसरात आक्रोश पसरला होता.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मुंबईतील चेंबूर येथे प्राणी प्रेमी आणि स्थानिकांना मोठा धक्का
6 मांजरी आणि एका चिमुकल्या मांजरीच्या पिल्लाची क्रूरतेनं हत्या
Mumbai Crime : मुंबईतील चेंबूर येथून प्राणी प्रेमी आणि स्थानिकांना मोठा धक्का बसला आहे. पांजरापोला परिसरात एका इसमाने 6 मांजरी आणि एका मांजरीचे मृत पिल्लू आढळून आले होते. या घटनेनंतर परिसरात आक्रोश पसरला होता. या प्रकरणात आरसीएफ पोलिसांनी एका आरोपीला अटक केली. या घटनेनंतर नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
हे ही वाचा : वसई-विरारमध्ये आगमनादरम्यान ट्रॉली उलटली, दुर्घटनेत बाप्पांची मूर्ती कोसळली
6 मांजरी आणि एका चिमुकल्या मांजरीच्या पिल्लाची क्रूरतेनं हत्या
संबंधित प्रकरणात 6 मांजरी आणि एका मांजरीच्या पिल्लाचा मृतदेह आढळून आल्याची माहिती समोर आली. या घटनेमुळे स्थानिक नाराज झाले होते. संबंधित प्रकरणात आरोप करण्यात आला की, 6 मांजरी आणि एका चिमुकल्या मांजरीच्या पिल्लाची क्रूरतेनं हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाची रुबिना पठान नावाच्या महिलेनं पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
आरोपीकडून गुन्ह्याचा कबुलीनामा
तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी 7 सप्टेंबर 2026 रोजी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी प्रकरणाचा तपास करत पुरावा गोळा करून आरोपीला अटक केली होती. पोलिसांच्या माहितीनुसार, चौकशी सुरू असताना आरोपीने आपल्या गुन्ह्याचा कबुलीनामा दिला होता. या प्रकरणात फॉरेन्सिक पुरावे देखील गोळा केले जात आहेत. डीसीपी समीर शेख यांच्या माहितीनुसार, पोलीस या घटनेमागील हेतू शोधण्याचाही प्रयत्न करत आहेत.
हे ही वाचा : महिलेचा दीरावर जडला जीव, दुधात गुंगीचे औषध मिसळून नवऱ्याला संपवलं
पोलीस आरोपीला न्यायालयात हजर करणार असून पुढील तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी केली जाईल. पोलिसांनी सांगितलं की, ते घटनास्थळावरून पुरावे, पंचनामे आणि इतर तांत्रिक पुरावे गोळा करत आहेत. या घटनेनं प्राणीप्रेमी आणि स्थानिक रहिवाशांमध्ये संताप निर्माण झाला आहे. निष्पाप प्राण्यांवर क्रूर अत्याचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे, अशी लोकांची मागणी आहे.
