दोन महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केला, पण सुखी संसाराच्या स्वप्नांचा भयंकर शेवट
एका तरुणाने संतापाच्या भरात आपल्या पत्नीच्या डोक्यात रॉड घालून हत्या केली. दोनच महिन्यांपूर्वी या दोघांचा प्रेमविवाह झाला होता. कानपूरमधील ही घटना नेमकी काय आहे, जाणून घ्या सविस्तर.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
दोन महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केला
पण सुखी संसाराच्या स्वप्नांचा भयंकर शेवट
Crime News : उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यात कौटुंबिक वादातून एका 29 वर्षीय महिलेची तिच्याच नवऱ्याने हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच या दोघांनी प्रेमविवाह केला होता. या घटनेनंतर आरोपी पतीने स्वत:च पोलिसांना फोन करून गुन्हा कबूल केला आणि घटनेची माहिती दिली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू केली आहे.
फोनवर बोलण्यावरुन वाद
सपना उर्फ आसमा असे मृत महिलेचे नाव असून ती पती गजेंद्र शंखवार (वय 30) याच्यासोबत भाड्याच्या घरात राहत होती. गजेंद्र हा गवंडीकाम करतो. रविवारी (6 सप्टेंबर) सकाळी साडेदहाच्या सुमारास सपना मोबाईलवर कोणाशीतरी बोलत होती. त्याच वेळी फोनवर बोलण्यावरून आणि इतर काही कारणांवरून दोघांमध्ये अचानक वाद सुरू झाला. हा वाद इतका वाढला की रागाच्या भरात गजेंद्रने घरातील लोखंडी रॉड उचलून सपनाच्या डोक्यावर जोरदार वार केला.
हे ही वाचा : ऑपरेशन थिएटरमध्ये नर्सवर सामूहिक अत्याचार, व्हिडिओ बनवून धमकावलं
डोक्यात घातला रॉड
रॉडचा वार लागताच सपना रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळली. या घटनेनंतर घाबरलेल्या गजेंद्रने स्वत:च पोलिसांना फोन करून पत्नीची हत्या केल्याचे सांगितले. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमी झालेल्या सपनाला रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
हे ही वाचा : चलाख सुनेनेच रडून फसवलं! चाकूचे 26 वार, सासऱ्याची निघृण हत्या
दोन महिन्यांपूर्वी विवाह
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांनी साधारण दोन महिन्यांपूर्वीच कोर्ट मॅरेज केले होते. सपनाने लग्नापूर्वी प्रतिज्ञापत्र सादर करून हिंदू धर्म स्वीकारला होता, अशी माहिती स्थानिक पोलीस ठाण्याचे प्रभारी हरमीत सिंह यांनी दिली. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून आरोपी पतीची कसून चौकशी सुरू आहे.
