चलाख सूनेनेच रडून फसवलं! चाकूचे 26 वार, सासऱ्याची निघृण हत्या

मुंबई तक

kanpur crime news : कानपूरमधील औषध व्यापारी विनीत मिनोचा यांच्या हत्येचा तपास करताना पोलिसांसमोर धक्कादायक कट उघड झाला. सीसीटीव्ही, सीडीआर आणि संशयितांच्या चौकशीत त्यांच्या सुनेचा या हत्याकांडातील कथित मास्टरमाइंड म्हणून खुलासा झाला.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

चलाख सूनेनेच रडून फसवलं!

point

चाकूचे 26 वार, सासऱ्याची निघृण हत्या

Crime News : कानपूरमधील औषध व्यापारी विनीत मिनोचा यांच्या हत्येने खळबळ उडालीये. 5 सप्टेंबरच्या रात्री विनीत मिनोचा हे घरात एकटे होते. त्यांचा मुलगा सुब्रत, सून शालू आणि सहा वर्षांचा नातू पार्टीसाठी रात्री साडेनऊच्या सुमारास घराबाहेर गेले होते. पहाटे सव्वा चारच्या आसपास ते घरी परतले. त्यावेळी शालू स्वयंपाकघरात पाणी पिण्यासाठी गेली असता तिला एका खोलीतून रक्ताचा सडा पडलेला दिसला. तिने आरडाओरडा केल्यानंतर सुब्रतने खोलीचा दरवाजा उघडला. विनीत मिनोचा मृतावस्थेत होते. आसपासचे लोक घटनास्थळी जमा झाले आणि त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. तपासादरम्यान घरातून कोणतीही मौल्यवान वस्तू चोरीला गेल्याचे किंवा जबरदस्तीने घरात प्रवेश केल्याचे पुरावे पोलिसांना आढळले नाहीत. त्यामुळे हत्या करणाऱ्याला घराची माहिती असावी, असा पोलिसांचा संशय होता.

हेही वाचा : बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं, शुगर डॅडीलाही संपवण्याची धमकी

सूनेने रचललेला कट कसा उघडकीस आला?

पोलिसांनी घरातील आणि घराबाहेरील सीसीटीव्ही तपासले असता दोन संशयित व्यक्ती रात्रीच्या वेळी घरात शिरल्याचे दिसून आले. हे दोघे तब्बल 112 मिनिटे घरात होते. त्यानंतर पोलिसांनी इमारतीतील सुरक्षारक्षकांची चौकशी केली. त्यावेळी एक महत्त्वाचा धागा पोलिसांच्या हाती लागला. सुब्रत, शालू आणि त्यांचा मुलगा पार्टीसाठी बाहेर जात असताना शालूने सुरक्षा रक्षकाला ‘विशाल येईल, त्याला घरी जाऊ द्या आणि त्याची एन्ट्री करण्याची गरज नाही’, असे सांगितल्याचे समोर आले. सीसीटीव्हीमधील संशयितांपैकी एकाची ओळख विशाल गौतम अशी पटली, तर दुसरा राजकिशोर होता. विशाल हा सुमारे 12 वर्षांपूर्वी मिनोचा यांच्या घरी काम करत होता. चोरीच्या आरोपावरून 2022 मध्ये त्याला कामावरून काढण्यात आले होते. पोलिसांनी दोघांचा शोध घेतला आणि त्यांना ताब्यात घेतल्यानंतर चौकशीत या हत्याकांडाचा धक्कादायक खुलासा झाला.

हेही वाचा ; फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी मराठ्यांचा बळी घेतला, आपण बदला नक्की घेऊ; जरांगेंचं थेट आव्हान