Maharashtra Weather : राज्यात पावसाचा जोर वाढणार, 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट

Maharashtra Weather : राज्यात सध्या हवामानात काही प्रमाणात बदल घडत असल्याचा अंदाज आहे. भारतीय हवामान विभागानुसार 18 ऑक्टोबर 2026 रोजी वर्तवविलेल्या अंदाजानुसार हवामानाचा अंदाज पुढीलप्रमाणे..

ADVERTISEMENT

maharashtra weather rainfall (AI Photo)
maharashtra weather rainfall (AI Photo)
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

 राज्यात हवामानात काही प्रमाणात बदल

point

भारतीय हवामान विभागानुसार 18 ऑक्टोबर 2026 रोजी पावसाचा अंदाज...

Maharashtra Weather : राज्यात सध्या हवामानात काही प्रमाणात बदल घडत असल्याचा अंदाज आहे. भारतीय हवामान विभागानुसार 18 ऑक्टोबर 2026 रोजी वर्तवविलेल्या अंदाजानुसार, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात काही जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांसह मराठवाडा आणि विदर्भात अनेक जिल्ह्यांत हवामान हे कोरडं राहण्याची अधिकची शक्यता आहे.  

हे ही वाचा :  लातूरात लव्ह ट्रँगल, प्रेयसीचा स्क्रू ड्रायव्हरने चिरला गळा

कोकण 

कोकणातील मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात हवामान कोरडे राहण्याची अधिकची शक्यता आहे. तर रायगड जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची नोंद आहे. 

पश्चिम महाराष्ट्र

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, पुणे घाटमाथा येथे हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि घाटमाथा परिसरात विजांचा कडकडाट राहून सोसायट्यांच्या वाऱ्यांची शक्यता आहे. या पाच ठिकाणी हलका ते मध्यम पावसाचा यलो अलर्ट आहे.  

उत्तर महाराष्ट्र 

उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार, धुळे, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांत हवामान कोरडे राहण्याची अधिकची शक्यता आहे. नाशिक घाटमाथा परिसरात पावसाचा अंदाज वर्तविलेला नाही. तर अहिल्यानगर जिल्ह्यात हवामान हे कोरडं राहण्याची शक्यता आहे.  

मराठवाडा 

मराठवाडा विभागात  छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांत हवामान कोरडे राहण्याची शक्य़ता आहे. परभणी आणि बीड जिल्ह्यांत मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे.  

हे ही वाचा :  जालना: 'दोघेही पळून लग्न करू..', पीडितेनं त्रासाला कंटाळून संपवलं जीवन

विदर्भ 

अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा, भंडारा, चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यांना हवामान विभागाने कोणताही अलर्ट वर्तविलेला नाही. या जिल्ह्यांत हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.