जरांगेंना मुंबईत नो-एन्ट्री? परवानगी नाकारत पोलिसांनी काय सांगितलं?
Maratha Reservation Protest : मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील मराठा आंदोलनाला आझाद मैदान पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. वाहतूक, कायदा-सुव्यवस्था, आरोग्य व्यवस्था आणि गणेशोत्सवाचा उल्लेख करत पोलिसांनी 10 ते 11 कारणं दिली आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
जरांगेंना मुंबईत नो-एन्ट्री?
परवानगी नाकारत पोलिसांनी काय सांगितलं?
Maratha Reservation Protest : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाला आझाद मैदान पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. यासंदर्भात आझाद मैदान पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू बीडकर यांनी जरांगे पाटील यांच्या नावाने पत्र दिलं आहे. हे पत्र पाच ते सहा पानी असून, त्यामध्ये आंदोलनाला परवानगी नाकारण्यामागे 10 ते 11 कारणं नमूद करण्यात आली आहेत. गणेशोत्सवामुळे मुंबईत होणारी गर्दी, कायदा आणि सुव्यवस्था, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, आरोग्य व्यवस्था आणि मागील वर्षी झालेल्या मराठा आंदोलनातील घडामोडींचा पोलिसांनी पत्रात उल्लेख केला आहे. तसेच जाहीर सभा, आंदोलने आणि मिरवणुकांसंदर्भातील 2025 मधील नियमांचं पालन होणार नसल्याची खात्री असल्याचंही पोलिसांनी म्हटलं आहे.
हेही वाचा : वसई-विरारमध्ये आगमनादरम्यान ट्रॉली उलटली, दुर्घटनेत बाप्पांची मूर्ती कोसळली
पोलिसांनी मागच्या आंदोलनाची आठवण करुन दिली
पोलिसांनी दिलेल्या पत्रानुसार, मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथील सभेत मुंबईत आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्याची घोषणा केली होती. आंदोलनासाठी एका दिवसाचीच परवानगी देण्याची तरतूद असल्याचं पोलिसांनी पत्रात नमूद केलं आहे. तसेच आंदोलनाची वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत निश्चित असल्याचं सांगण्यात आलं आहे. मागील वर्षी दिलेल्या परवानगीच्या अटींचं पालन झालं नसल्याचाही पोलिसांचा दावा आहे. त्यावेळी आंदोलन सायंकाळी 6 वाजेपर्यंत स्थगित करणं अपेक्षित असताना ते पुढे सुरू राहिल्याचं पत्रात म्हटलं आहे. याशिवाय आंदोलनासाठी सुमारे 5 हजार किंवा त्यापेक्षा जास्त आंदोलक येणार असल्याचं अर्जात नमूद करण्यात आलं होतं. मात्र, मागील आंदोलनाच्या वेळी 5 हजार आंदोलकांची मर्यादा असताना सुमारे 40 हजार आंदोलक आझाद मैदान परिसरात आल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.
हेही वाचा : मुंबईत सहा मांजरांसह एका पिल्लाला संपवलं, विखुरलेले आढळले मृतदेह
