लेक 40 दिवसांनी आला, मिठी मारत रडले, धमक्या, भीती सांगितली, अभिजीतलाही रडू आलं
Abhijeet Dipke parents emotional reaction : 40 दिवसांनंतर अभिजीत दिपके घरी परतल्यानंतर त्यांच्या आई-वडिलांनी भीती, तणाव आणि मुलाबद्दलचा अभिमान व्यक्त केला. आंदोलनातील दिवसांच्या आठवणी सांगताना त्यांनी भावनिक प्रतिक्रिया दिली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
लेक 40 दिवसांनी आला, मिठी मारत रडले
धमक्या, भीती सांगितली, अभिजीतलाही रडू आलं
Abhijeet Dipke parents emotional reaction : कॉक्रोच जनता पार्टी (CJP) प्रमुख अभिजीत दिपके तब्बल 40 दिवसांनंतर छत्रपती संभाजीनगर येथील आपल्या राहत्या घरी परतले. त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. घोषणाबाजी आणि जल्लोषाच्या वातावरणात दिपके यांचे स्वागत करण्यात आले. यानंतर त्यांच्या आई-वडिलांनी पत्रकारांशी संवाद साधत गेल्या 40 दिवसांतील भीती, तणाव आणि मुलाबद्दलचा अभिमान व्यक्त केला. मुलगा सुखरूप परतला, हीच आमच्यासाठी सर्वात मोठी गोष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा : Personal Finance: EMI भरत आहात? ही 'एक चूक' तुम्हाला पडू शकते 15 लाखांनी महाग!
'प्रबळ राजसत्तेला टक्कर देणे ही साधी गोष्ट नाही'
अभिजीत दिपके यांच्या वडिलांनी सांगितले की, दिल्लीतील आंदोलनादरम्यान झालेला लाठीचार्ज आणि आंदोलनकर्त्यांशी पोलिसांनी केलेली वागणूक पाहून मुलगा सुखरूप घरी परतेल की नाही, अशी भीती सतत मनात होती. मात्र तो आपले काम पूर्ण करून विजयी होऊन परतत असल्याचा मोठा अभिमान असल्याचे त्यांनी नमूद केले. एका प्रबळ राजसत्तेला टक्कर देणे ही साधी गोष्ट नसून, त्याने केलेले काम मोठे असल्याचेही त्यांनी म्हटले. त्याचबरोबर अभिजीतला परदेशातून चांगल्या नोकरीच्या संधी होत्या, तरीही त्या सोडून तो देशातील विद्यार्थ्यांसाठी लढण्यासाठी परतला. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
हेही वाचा : पार्थ पवार आणि कायनात दारा यांचा साखरपुडा संपन्न, पुण्यातील समारंभाला दिग्गजांची उपस्थिती
