Personal Finance: EMI भरत आहात? ही 'एक चूक' तुम्हाला पडू शकते 15 लाखांनी महाग!

रोहित गोळे

Home Loan Tips: तुम्ही होम लोनचा EMI नियमित भरत असाल, तरीही एक छोटी आर्थिक चूक तुम्हाला लाखोंचा अतिरिक्त व्याजाचा बोजा देऊ शकते.

ADVERTISEMENT

personal finance paying emi one mistake could cost you an extra rs 15 lakh
Personal Finance
Google CTA

Personal Finance Home Loan Tips: घर खरेदी करणे हे प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबाचे स्वप्न असते. मात्र, हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बहुतांश लोक 20 ते 30 वर्षांच्या कालावधीसाठी होम लोन घेतात. अनेक जण वेळेवर EMI भरत असल्यामुळे आपण योग्य आर्थिक निर्णय घेतला आहे, असे समजतात. पण प्रत्यक्षात लाखो रुपये अतिरिक्त व्याज भरावे लागण्यामागे एक मोठी चूक कारणीभूत असते.

ती चूक म्हणजे उत्पन्न वाढल्यानंतरही अनेक वर्षे EMI किंवा Part Payment मध्ये कोणताही बदल न करणे.

अनेकांचे पगार दरवर्षी वाढतात, बोनस मिळतो, पण होम लोनची EMI मात्र वर्षानुवर्षे तशीच राहते. यामुळे कर्जाचा कालावधी कमी होत नाही आणि बँकेला मोठ्या प्रमाणात अतिरिक्त व्याज द्यावे लागते.

ही चूक नेमकी कशी महाग पडते?

समजा, एखाद्या व्यक्तीने 50 लाख रुपयांचे होम लोन 20 वर्षांसाठी 8.5 टक्के व्याजदराने घेतले आहे.