फलटणमधील डॉक्टरची कथित सुसाईड नोट व्हायरल, भाजप नेत्याचं नाव घेत गंभीर आरोप

इम्तियाज मुजावर

Satara Crime News : सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालय आता पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात आले आहेत. रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र रुपनवर यांनी हातावर कथित सुसाईड नोट लिहिल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.

ADVERTISEMENT

satara crime news
satara crime news
Google CTA

बातम्या हायलाइट

point

तानाजी सावंत यांच्या कथितरित्या पीएकडून दबाव

point

हातावर सुसाईड नोट 

Satara Crime News : सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालय आता पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात आले आहे. याच रुग्णालयातील कर्मचारी संपदा मुंडे यांच्या हातावर सुसाईड नोट लिहून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्यानंतर रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र रुपनवर यांनी हातावर कथित सुसाईड नोट लिहिल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. भाजप नेत्याच्या पीएनं दबाव आणल्याचा दावा करण्यात आल्याचा आरोप आहे, या घटनेनं परिसर हादरून गेला आहे.  

हे ही वाचा : गर्लफ्रेंडपासून दूर होणं तरुणाला सहन झालं नाही, प्रियकराने हॉटेलमध्ये गळफास घेत संपवलं जीवन

तानाजी सावंत यांच्या कथितरित्या पीएकडून दबाव, हातावर सुसाईड नोट 

डॉ. रुपनवर यांनी माध्यमासमोर येत सांगितलं की, माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या कथितरित्या पीएकडून दबाव आणण्यात आला होता. नंतर जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती. या मानसिक त्रासातून आपण हातावर सुसाईड नोट लिहिल्याचा दावा करण्यात आला. हीच भूमिका त्यांनी सार्वजनिकपणे मांडण्याचा प्रयत्न देखील केला होता. 

फलटण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल 

दरम्यान, या प्रकरणात संबंधित व्यक्तीविरोधात फलटण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. संबंधित प्रकरणात गुन्हाही दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली. जिल्हा आरोग्य प्रशासनाने या प्रकरणाची गंभीरपणे दखल घेतली आहे. या घटनेची संपूर्ण चौकशी सुरू ठेवण्यात आली आहे. 

हे ही वाचा : मैत्रिणीच्या पार्टीत महिलेवर लैंगिक अत्याचार, एक्स बॉयफ्रेंडकडून 'तसले' व्हिडिओ शेअर करण्याची धमकी

संपदा मुंडे यांच्या प्रकरणानंतर रुग्णालयात असाच प्रकार आता समोर आल्याने विभागाच्या कार्यपद्धतीवर आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित केले जातायत. या प्रकरणाची निष्पक्ष पारदर्शकता आणि उच्चस्तरीय चौकशी करत सत्य समोर आणण्याची मागणी जोर धरू लागली आहे.