Maharashtra Weather : दिवाळी सणाच्या तोंडावर मुरासू चक्रीवादळ, 'या' जिल्ह्यांत पावसाचा अलर्ट

Maharashtra Weather : पश्चिम बंगालच्या उपसागरात अर्णब चक्रीवादाळानंतर आता मुरासू चक्रीवादळ निर्माण झाले आहे, याचाच आता राज्यातील काही भागांवर परिणाम होणार आहे, जाणून घ्या एकूण हवामान विभागाचा अंदाज पुढीलप्रमाणे..

ADVERTISEMENT

Maharashtra Weather (AI Photo)
Maharashtra Weather (AI Photo)
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

पश्चिम बंगालच्या उपसागरात अर्णब चक्रीवादाळानंतर मुरासू चक्रीवादळ

point

4 नोव्हेंबर रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज पुढीलप्रमाणे..

Maharashtra Weather : पश्चिम बंगालच्या उपसागरात अर्णब चक्रीवादाळानंतर आता मुरासू चक्रीवादळ निर्माण झाले आहे, याचाच आता राज्यातील काही भागांवर परिणाम होणार आहे. राज्यातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता अधिक वाढली आहे. भारतीय हवामान विभागाने 4 नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या जिल्हानिहाय हवामान अंदाजानुसार, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागात काही जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसासह मेघगर्सनेची अधिकची शक्यता आहे. अशातच जाणून घेऊयात 4 नोव्हेंबर रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आला. 

हे ही वाचा : डोंबिवली: किरकोळ वादातून मित्राला संपवलं, तरुण स्वप्नात येऊन छळू लागला अन्..

कोकण 

कोकण विभागात पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यांत हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. या भागांत नागरिकांना पावसापासून दिलासा मिळणार आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत हलक्या पावसासह मेघगर्जनेची शक्यता आहे. 

उत्तर महाराष्ट्र 

उत्तर महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांत पावसाची शक्यता नाहीये. तसेचज अहिल्यानगर जिल्ह्यात कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. तसेच तापमानाच चढ उतार पाहायला मिळणार आहे. रात्रीच्या वेळी वातावरणात गारवा राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

पश्चिम महाराष्ट्र 

पश्चिम महाराष्ट्रात पुणे, पुणे घाटमाथा परिसरात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर, कोल्हापूर घाटमाथा, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे, तर पुढील काही दिवस कोरड्या हवामानाची शक्यता वर्तवण्यात आली. 

मराठवाडा 

मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्ह्यांत मेघगर्जनेसह हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तर धाराशिव आणि बीड या दोन जिल्ह्यांत हवामान कोरडे राहील. काही भागांत वातावरण कोरडं राहणार आहे.  

हे ही वाचा : नांदेड : पत्नीच्या हत्येत नवरा अटक, पोलीस ठाण्यातच संपवलं जीवन

विदर्भ 

विदर्भ विभागातील अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या सर्वच जिल्ह्यांत पावसाची शक्यता नाही, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. तसेच याच विभागात तापमानात सतत चढ-उतार होताना दिसतो, अशी शक्यता आहे.