विवाहित प्रेयसीने फोन करताच भेटायला गेला, पण गर्लफ्रेंडच्या पतीने इतकं मारलं की जीव गेला!

Crime News : कानपूरमध्ये विवाहित प्रेयसीला भेटायला गेलेल्या 28 वर्षीय अतुलची काठ्यांनी मारहाण करून हत्या करण्यात आली. या प्रकरणी प्रेयसीच्या पतीसह कुटुंबातील सदस्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

विवाहित प्रेयसीने फोन करताच भेटायला गेला,

point

पण गर्लफ्रेंडच्या पतीने इतकं मारलं की जीव गेला!

Crime News : कानपूरमध्ये विवाहित प्रेयसीला भेटायला गेलेल्या 28 वर्षीय तरुणाची मारहाण करून हत्या करण्यात आली. प्रेयसीच्या पतीसह कुटुंबातील महिलांनी काठ्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. गंभीर जखमी अवस्थेत तरुणाने आईच्या पायावर पडून घरी घेऊन जाण्याची विनंती केली. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याची प्रकृती खालावली आणि डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.उत्तर प्रदेशातील कानपूरच्या साढ परिसरात ही घटना घडली. अतुल असे मृत तरुणाचे नाव असून तो गंभीरपूर गावातील रहिवासी होता. 

प्रेयसीच्या कुटुंबीयांनी दोघांना पकडले, अन् बेदम मारहाण 

अधिकची माहिती अशी की, अतुलचे वडील विजय प्रकाश तिवारी आहेत. अतुल पेट्रोल पंपावर काम करत होता. त्याचबरोबर तो रिक्षाही चालवत असे. शनिवारी रात्री गावातील विवाहित प्रेयसी सुमन हिने फोन करून अतुलला भेटण्यासाठी बोलावले होते. त्यानुसार अतुल तिच्या घरी पोहोचला. मात्र, तिथे प्रेयसीच्या कुटुंबीयांनी दोघांना पकडले. त्यानंतर सुमनचा पती विकास अवस्थी आणि घरातील महिलांनी अतुलला काठ्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत अतुल गंभीर जखमी झाला. त्याच्या शरीरावर जवळपास 50 ठिकाणी जखमा झाल्याचे सांगण्यात आले आहे. मारहाणीनंतर त्याला एका खोलीत बंद करण्यात आले. त्यानंतर प्रेयसीचे सासरे स्वतः अतुलच्या घरी गेले आणि त्याच्या आईला घेऊन आले. अतुलची आई शीला आणि त्याचा काका त्याला घेण्यासाठी पोहोचले. त्यावेळी गंभीर जखमी झालेला अतुल आईच्या पायावर पडला आणि मला घरी घेऊन चला, अशी विनंती करू लागला. त्यानंतर आईने त्याला नौबस्ता येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्याला मृत घोषित केले. पुढील कारवाईसाठी पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठवला.

हेही वाचा : मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर ट्रकमध्ये मागून कार घुसली, मृत दाम्पत्याच्या कुटुंबियांना 1.80 कोटींची भरपाई

अतुलच्या मृत्यूनंतर रविवारी कुटुंबीयांनी मृतदेहासह रस्त्यावर उतरून रास्ता रोको केला. आरोपी विकास अवस्थी याच्यावर यापूर्वीही गंभीर गुन्हा दाखल असल्याचा आरोप अतुलच्या कुटुंबीयांनी केला. गावात आलेल्या एका मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी विकासला 2016 मध्ये अटक झाली होती. या प्रकरणात तो तुरुंगात गेला होता. मात्र, नंतर जामिनावर बाहेर आला होता, असा दावा अतुलच्या कुटुंबीयांनी केला. विकासने पत्नी आणि घरातील इतर सदस्यांच्या मदतीने अतुलला मारहाण केल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोपही त्यांनी केला. आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवण्याची मागणी करत कुटुंबीयांनी रास्ता रोको केला. यावेळी घटनास्थळी पोहोचलेल्या एसीपी कृष्ण कुमार यादव यांनी अनेक तास समजूत काढल्यानंतर आंदोलकांना शांत केले. त्यानंतर विकास अवस्थी, त्याची पत्नी, आई आणि प्रेयसी यांच्याविरोधात अतुलच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी अतुलची प्रेयसी आणि तिच्या सासूला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. अनैतिक संबंधांच्या कारणावरून अतुलची हत्या झाल्याची प्राथमिक माहिती असल्याचे एसीपी कृष्ण कुमार यादव यांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.