नववीच्या मुलाला घरातून बोलावलं, विटेनं हल्ला करत छातीत चाकूनं भोसकलं
Crime News : नववीत शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याला मंगळवारी रात्री काही लोकांनी घरातून बोलावले. नंतर त्याचा पाठलाग करून विटेनं हल्ला करत चाकूने वार करत त्याची हत्या केली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
तिघांचा नववीतील विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला
खून करण्यात आलेल्या कुटुंबीयांचा आरोप
Crime News : नववीत शिक्षण घेणाऱ्या इंतजार (वय 17) या विद्यार्थ्याला मंगळवारी रात्री काही लोकांनी घरातून बोलावले. नंतर त्याचा पाठलाग करून विटेनं हल्ला करत चाकूने वार करत संपवले. गुन्हे शाखेनं कारवाई करत आरोपी असलेल्या अरमान (वय 18) आणि अल्फाईज (वय 18) या दोघांना अटक केली. त्यांचा तिसरा साथीदार आरोपी अद्यापही फरार असल्याची माहिती समोर आली. ही घटना दिल्लीच्या ज्योतीनगरातील कदमपुरी परिसरातील आहे. या घटनेनं परिसर पूरता हादरून गेला आहे.
हे ही वाचा : पतीला विषारी पदार्थ देऊन केलं बेशुद्ध, मुलीला दुसऱ्या खोलीत पाठवून आईसोबत अत्याचार
संबंधित प्रकरणात डीसीपी राहुल अलवाल यांनी सांगितलं की, 28 जुलै रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास जीटीबी रुग्णालयातून ज्योतीनगर पोलीस ठाण्यात घटनेची माहिती मिळाली होती. कर्दमपूर रहिवासी इंतजार (वय 17) याला रुग्णालयात आणण्यात आले होते. नंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले होते. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले होते.
तिघांचा नववीतील विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला
तपासातून उघडकीस आले की, इंतजार आपल्या कुटुंबासह करदमपुरी भागातील गल्ली क्रमांक 6 येथील रहिवासी आहेत. कुटुंबात वडील, बाबू अली, आई आणि दोन बहिणी आहेत. प्राथमिक तपासातून समोर आले की, करदमपुरी येथील गल्ली क्रमांक 4 मध्ये तीन तरुणांनी इंतजारवर चाकूने हल्ला केला. ज्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. संबंधित प्रकरणात पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.
हे ही वाचा : शाळेच्या बसमध्ये पाचवीच्या विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी
खून करण्यात आलेल्या कुटुंबीयांचा आरोप
इंतजारच्या कुटुंबीयांनी सांगितलं की, मंगळवारी सायंकाळी सुमारे साडेसात वाजण्याच्या सुमारास रेहान त्याला बोलावण्यासाठी आला होता, नंतर स्कूटवरून घेऊन गेला. ते तिघेही एका पुलाजवळ पोहोचले होते. तेव्हा तिथे अरमान आणि अल्फाईझ उपस्थित होता. तिघांनी पुलाजवळ मुलावर विटेने हल्ला केला. इंतजारने तिथूनही पळून जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आरोपींनी त्याच्या छातीत चाकूने हल्ला केला. कुटुंबीयांच्या माहितीनुसार, इंतजारचे कोणाशीही वैयक्तिक वैर नव्हते.
