पतीला विषारी पदार्थ देऊन केलं बेशुद्ध, मुलीला दुसऱ्या खोलीत पाठवून आईसोबत अत्याचार
Crime News : मुलीला न्याय मिळवून देण्याच्या नावाखाली महिलेवर एका हॉटेलमध्ये लैंगिक अत्याचार केला. पीडित महिलेनं पोलिसांकडे न्यायाची मागणी केली असता, पोलिसांनी तपास सुरू केला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पीडितेच्या नवऱ्याला विषारी पदार्थ खाऊ घातला
मुलीला खोलीत पाठवून पीडितेवर लैंगिक अत्याचार
Crime News : मुलीला न्याय मिळवून देण्याच्या नावाखाली महिलेवर एका हॉटेलमध्ये लैंगिक अत्याचार केला. महिलेनं नगरपंचायत अध्यक्ष प्रतिनिधी अहमद हुसैनवर जबरदस्ती हॉटेलमध्ये नेत लैंगिक अत्याचाराचा आरोप आहे. नंतर बेदम मारहाण देखील केली. पीडित महिलेनं पोलिसांकडे न्यायाची मागणी केली असता, पोलिसांनी तपास सुरू केला. ही घटना बिहारच्या किशनगंज येथील आहे.
हे ही वाचा : फलटणमधील डॉक्टरची कथित सुसाईड नोट व्हायरल, भाजप नेत्याचं नाव घेत गंभीर आरोप
पीडितेच्या नवऱ्याला विषारी पदार्थ खाऊ घातला
पीडित महिलेनं आरोप केला की, 28 जुलै रोजी रात्री तिच्या मुलीच्या न्याय निवाड्यासाठी तिच्या नवऱ्याला आणि मुलीला एका वाहनातून नेण्यात आले होते. यानंतर रस्त्यात नवऱ्याला विषारी पदार्थ खाऊ घातला आणि बेशुद्ध केलं. यानंतर महिलेला किशनगंज येथील एका हॉटेलमध्ये नेण्यात आले आणि आरोपींनी महिलेवर अत्याचार केला.
मुलीला खोलीत पाठवून पीडितेवर लैंगिक अत्याचार
पीडितेनं सांगितलं की, आधी मुलीसोबत लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या प्रयत्नाला अपयश मिळाले. मुलीला दुसऱ्या खोलीत पाठवण्यात आले, नंतर पीडित महिलेसोबत अश्लील कृत्य करण्यात आले. पीडितेचा असा आरोप की, घटनेदरम्यान विरोध केल्यानंतर पीडितेला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. नंतर पाच लाख रुपयांची मागणी देखील केली.
हे ही वाचा : शाळेच्या बसमध्ये पाचवीच्या विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी
या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करत, धमकी देणं सुरूच ठेवलं. पीडितेनं पोलिसांशी आरोपींच्या अटकेची आणि कौटुंबिक सुरक्षिततेची मागणी केली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलमांन्वये गुन्हा दाखल केला. पोलिसांच्या माध्यमातून कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
