शाळेच्या बसमध्ये पाचवीच्या विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी

मुंबई तक

Crime News : एका शाळेच्या बसमध्ये पाचवीत शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. बस चालक आणि त्याचा मित्र काही महिन्यांपासून विद्यार्थिना धमकावू लागला होता. शुक्रवारी विद्यार्थिनीने वर्ग शिक्षिकेला या प्रकरणाची माहिती दिली होती.

ADVERTISEMENT

Crime News (AI Photo)
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

पोलिसांकडून व्हॅनने येणाऱ्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांची चौकशी

point

विद्यार्थीनीसोबत व्हॅन चालकाचं घृणास्पद कृत्य 

Crime News : एका शाळेच्या बसमध्ये पाचवीत शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. बस चालक आणि त्याचा मित्र काही महिन्यांपासून विद्यार्थिनीला धमकावू लागला होता. शुक्रवारी विद्यार्थिनीने वर्ग शिक्षिकेला या प्रकरणाची माहिती दिली होती. हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं होतं. पोलिसांनी विद्यार्थ्यांचं काउंसलिंग करून मारहाण करण्याची धमकी दिली होती. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही घटना दिल्लीच्या सिविल लाइन्स परिसरातील आहे. 

हे ही वाचा : फलटणमधील डॉक्टरची कथित सुसाईड नोट व्हायरल, भाजप नेत्याचं नाव घेत गंभीर आरोप

पोलिसांकडून व्हॅनने येणाऱ्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांची चौकशी

पोलिसांनी या व्हॅनने येणाऱ्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांची चौकशी करत होते. चौकशीतून हे प्रकरण नेमकं कोणी केलं याचा ते तपास करत होते. आरोपींनी दुसऱ्या विद्यार्थ्यांशी असं गैरकृत्य तर केलं नाही ना? असा पोलिसांसमोर प्रश्न उपस्थित होता. शुक्रवारी पीडितेनं शिक्षिकेला या घटनेची माहिती दिली होती. नंतर पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करत कारवाई केली. 

विद्यार्थीनीसोबत व्हॅन चालकाचं घृणास्पद कृत्य 

एका पोलीस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, 11 वर्षाची पीडित विद्यार्थीनी दिल्लीत राहत होती. आरोपी चालक सकाळी 7 वाजता विद्यार्थिनीला घेऊन जाण्यासाठी घरातून बाहेर पडला होता. आरोपी आणि त्याच्या मित्राने याचा फायदा उचलून मुलीसोबत घृणास्पद कृत्य केलं. नंतर आरोपीने व्हिडिओ व्हायरल करून सोशल मीडियावर शेअर करणार असल्याची धमकी देखील दिली. 

हे ही वाचा : गर्लफ्रेंडपासून दूर होणं तरुणाला सहन झालं नाही, प्रियकराने हॉटेलमध्ये गळफास घेत संपवलं जीवन

पीडित विद्यार्थीनी नैराश्याचा सामना करत आहे. शुक्रवारी चिमुरडीने या घटनेची वर्ग शिक्षिकेला माहिती दिली. नंतर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली असता, आरोपींना अटक केली. तपासादरम्यान आरोपींनी आपल्या गुन्ह्याचा कबुलीनामा दिला होता. आरोपीचं म्हणणं असंय की, त्यांनी इतर कोणत्याच विद्यार्थीनीशी वाईट कृत्य केलं नाही.