महिलेचा आवाज.., 'जरांगेंना शिंदेंमार्फत 500 कोटी पोहोचले'; ऑडिओ क्लीपने राज्यात खळबळ

Manoj Jarange : दसरा मेळाव्यात मनोज जरांगे यांनी केलेल्या 500 कोटी रुपयांच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर आता कथित ऑडिओ क्लिप समोर आणली आहे. या क्लिपमध्ये श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून जरांगेंपर्यंत 500 कोटी पोहोचल्याचा दावा करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

ADVERTISEMENT

Manoj Jarange
Manoj Jarange
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

'श्रीकांत शिंदेंमार्फत जरांगेंना 500 कोटी पोहोचले',

point

जरांगेंनी ऐकवलेल्या क्लीपने राज्यात खळबळ

Manoj Jarange Patil Audio Clip : मराठा  आंदोलक मनोज जरांगे यांनी दसरा मेळाव्यात 500 कोटी रुपयांच्या कथित व्यवहाराचा उल्लेख करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला लक्ष्य केलं होतं. या आरोपांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या कॉन्फरन्स मीटिंगमधील असल्याचा दावा केला जाणारी एक कथित ऑडिओ क्लिप मनोज जरांगेंनी आज (दि.22) पत्रकार परिषदेत ऐकवली. क्लिपमध्ये श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून जरांगेंपर्यंत 500 कोटी पोहोचल्याचा दावा करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. शिवाय, हे सगळं एक महिला बोलत असल्याचं क्लीपमधून समोर आलं. ('मुंबई तक' या क्लीपची पुष्टी करत नाही.)

श्रीकांत शिंदेंमार्फत जरांगेंना 500 कोटी पोहोचल्याचा दावा

संबंधित महिला मनोज जरांगे यांच्यापर्यंत 500 कोटी रुपये पोहोचल्याचा दावा करताना ऐकू येत आहे. हे पैसे श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून पोहोचल्याचा उल्लेखही या कथित संभाषणात असल्याचं सांगितलं जात आहे. ही क्लिप विधानसभा निवडणुकीपूर्वीची असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या क्लीपची चौकशी व्हावी, अशी मागणी भाजप आणि शिंदेसेनेने केली आहे.

हेही वाचा : नागपूर : 10 वीच्या मुलाकडून कॉलेजात शिकणारी मुलगी गर्भवती, धक्कादायक प्रकार; गुन्हा दाखल

कथित ऑडिओ क्लिपमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांचा प्रभाव राजकीयदृष्ट्या फायदेशीर ठरेल की नाही, यावर चर्चा होत असल्याचं सांगितलं जात आहे. या ऑडिओ क्लिप्समध्ये भाजपचे नेते निरंजन डावखरे आणि प्रवीण दरेकर यांच्या नावाचा उल्लेख असून, जरांगे यांच्याविरोधात पक्षातून कोणीही बोलायला तयार नसल्याची खंतही त्यात व्यक्त करण्यात आली आहे.

मनोज जरांगेंचे सनसनाटी आरोप

दरम्यान, मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेत मराठा आरक्षण आंदोलनाविरोधात गेल्या तीन वर्षांपासून षड्यंत्र रचलं जात असल्याचा आरोप केला. मराठा समाजाला बदनाम करण्याचा आणि आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला जातोय. आंदोलन बंद पाडण्यासाठी त्रास दिला जातो, मराठा समाजातील कार्यकर्त्यांना लक्ष्य केलं जातं आणि समाजाला वेदना देण्याचे प्रयत्न केले जातात. निवडणुकीच्या काळात, उपोषणाच्या वेळी आणि आंदोलन सुरू असतानाही अशा प्रकारचे प्रयत्न होत असल्याचं त्यांनी सांगितलं.

या कथित षड्यंत्राचं स्वरूप आणि त्यामागे कोण आहे, हे महाराष्ट्रातील जनता आणि मराठा समाजासमोर मांडणार असल्याचं जरांगे यांनी स्पष्ट केलं. या प्रकरणातील प्रत्येक शब्दाकडे मराठा समाजाने बारकाईने लक्ष द्यावं, असं आवाहनही त्यांनी केलं. गरिबांसाठी काम करणं राज्यात किती अवघड झालं आहे, याचा विचार सर्वांनी करण्याची गरज असल्याचं ते म्हणाले. या पार्श्वभूमीवर कथित ऑडिओ क्लिपबाबत जरांगे पत्रकार परिषदेत काय खुलासा करतात आणि 500 कोटी रुपयांच्या आरोपांवर पुढे काय भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.