'पती परपुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवायला सांगायचे', 50 महिलांचा भयंकर अनुभव
50 हून अधिक महिलांनी दावा केला आहे की त्यांच्या जोडीदारांनी त्यांच्यावर इतर पुरुषांशी संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकला. जाणून घ्या नेमकं प्रकरण काय.
ADVERTISEMENT

पत्नी किंवा जोडीदाराला त्यांच्या इच्छेविरुद्ध इतर पुरुषांशी लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडणे ही केवळ नात्यातील समस्या नाही, तर ते नियंत्रक आणि हिंसक वर्तनाचे लक्षण मानलं जातं. बीबीसीच्या एका अहवालानुसार, 50 हून अधिक महिलांनी दावा केला आहे की, त्यांच्या जोडीदारांनी त्यांच्यावर अनोळखी व्यक्तींशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकला. अशा प्रकरणांमुळे, अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
एका अहवालानुसार, काही पुरुष जोडीदार आपल्या महिला जोडीदारांना परपुरुषांशी लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडतात. महिलांची इच्छा नसतानाही त्यांना हे करण्यास भाग पाडले जाते. ही परिस्थिती अशा पुरुषांच्या मानसिक स्थितीबद्दलही प्रश्न निर्माण करते, की एखादा पुरुष मानसिक समाधान किंवा पैशासाठी आपल्याच पत्नी किंवा जोडीदारासोबत असे कसे करू शकतो.
नेमकं काय घडलं?
अलीकडच्या वर्षांत, 'पार्टनर स्विंगिंग' आणि 'ओपन रिलेशनशिप' यांसारख्या संकल्पनांवर चर्चा वाढली आहे. पण, तज्ज्ञ यावर जोर देतात की, कोणत्याही प्रकारचे नातेसंबंध तेव्हाच स्वीकारार्ह असतात, जेव्हा त्यात सामील असलेल्या सर्व प्रौढांची स्पष्ट आणि मुक्त संमती असते.
हे ही वाचा>> 'कॉलेजचे 7 हजार विद्यार्थी HIV पॉझिटिव्ह', हा दावा अन् सगळेच हादरले.. सरकारकडून स्पष्टीकरण जारी
बीबीसीच्या एका अहवालानुसार, यूकेमधील 50 महिलांनी तक्रार केली आहे की, त्यांच्या जोडीदारांनी त्यांना अनोळखी व्यक्तींसोबत लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडले किंवा दबाव टाकला. याचे पुरावे फेसबुक आणि मीवे (MeWe) सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि ॲप्सवर आढळतात, जे परस्पर संमतीने जोडपी आणि अविवाहित व्यक्ती एकमेकांशी जोडले जाण्यासाठी वापरतात.
