Govt Jobs : सीआरपीएफमध्ये 9 हजारहून अधिक पदांची होणार भरती, 'ही' आहे अर्जाची शेवटची तारीख

मुंबई तक

सरकारी नोकरीसाठी प्रय्तन करणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची संधी चालून आली आहे. CRPF मध्ये लवकरच भरतीप्रक्रिया सुरु केली जाणार आहे.

ADVERTISEMENT

Govt Jobs
Govt Jobs
google news

बातम्या हायलाइट

point

Govt Jobs : सीआरपीएफमध्ये 9 हजारहून अधिक पदांची होणार भरती

point

'ही' आहे अर्जाची शेवटची तारीख

Govt Jobs : जर तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. या आठवड्यात देशातील विविध सरकारी विभागांमध्ये भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने केंद्रीय राखीव पोलीस दलाने (CRPF) कॉन्स्टेबल पदासाठी तब्बल 9,175 जागांची मोठी भरती जाहीर केली असून, यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

अर्ज प्रक्रिया कधी सुरु होणार?

या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 20 एप्रिल 2026 पासून अधिकृत वेबसाईटवर सुरू होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 19 मे 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज सादर करता येतील. शैक्षणिक पात्रतेबद्दल बोलायचे झाल्यास, उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासोबतच संबंधित ट्रेडमधील आयटीआय (ITI) पदवी असणे अनिवार्य करण्यात आले आहे.

हे ही वाचा : सांगली हादरली, आंतरजातीय लग्न, पण नवऱ्याचे तृतीयपंथीयासोबत संबंध; चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीची हत्या

वयोमर्यादा आणि इतर पात्रता

भरतीसाठी वयोमर्यादा 1 जानेवारी 2026 रोजी गृहीत धरली जाईल. यामध्ये ड्रायव्हर पदासाठी 21 ते 27 वर्षे आणि इतर ट्रेड्ससाठी 18 ते 23 वर्षे वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. नियमानुसार SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षे आणि OBC उमेदवारांना 3 वर्षांची सवलत देण्यात आली आहे. शारीरिक पात्रतेसाठी पुरुष उमेदवारांची उंची 170 सें.मी. (General/OBC) तर महिलांची उंची 157 सें.मी. असणे आवश्यक आहे. छातीचे मोजमाप पुरुषांसाठी 80 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त असणे गरजेचे आहे.

हे ही वाचा : नवरा कोट्याधीश, पण जीम ट्रेनरच्या नादी लागली बायको; प्रकरण कसं आलं उघडकीस? पुढे काय घडलं?

अर्जासाठी शुल्क किती?

निवड प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबवली जाणार असून यामध्ये शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET), शारीरिक मानक चाचणी (PST), संगणक आधारित परीक्षा (CBT), ट्रेड स्किल टेस्ट आणि कागदपत्र पडताळणीचा समावेश असेल. शेवटी वैद्यकीय चाचणीनंतर उमेदवारांची अंतिम निवड केली जाईल. जनरल, OBC आणि EWS उमेदवारांसाठी 100 रुपये अर्ज शुल्क असून, महिला आणि SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना शुल्कातून पूर्ण सूट देण्यात आली आहे.
 

हे वाचलं का?