नवरा कोट्याधीश, पण जीम ट्रेनरच्या नादी लागली बायको; प्रकरण कसं आलं उघडकीस? पुढे काय घडलं?
gym trainer arrest : सुरतमधील एका प्रतिष्ठित कुटुंबातील महिलेला प्रेमजाळात अडकवून तिच्या पतीला 5 लाख रुपयांसाठी ब्लॅकमेल करणाऱ्या जिम ट्रेनरला एसओजी पोलिसांनी अटक केली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पती कोट्याधीश, पण जीम ट्रेनरच्या नादी लागली पत्नी
प्रकरण कसं आलं उघडकीस? पुढे काय घडलं?
Crime News : गुजरातच्या सुरत शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली असून, एका प्रतिष्ठित हिंदू कुटुंबातील महिलेला प्रेमजाळात अडकवून तिच्या पतीला ब्लॅकमेल करणाऱ्या जिम ट्रेनरला एसओजी पोलिसांनी अटक केली आहे. सुरतमधील एका अब्जाधीश कुटुंबातील महिला सिटीलाईट परिसरातील एका जिममध्ये व्यायामासाठी जात होती. तिथे कार्यरत असलेला जिम ट्रेनर शब्बीर असगर ट्रंकवाला याने आपल्या बोलण्यातून या महिलेला भुरळ घातली आणि तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. गेल्या 7 वर्षांपासून हा आरोपी या महिलेच्या संपर्कात होता. मात्र, जेव्हा पीडित महिलेच्या पतीला आपले वैवाहिक जीवन धोक्यात असल्याचे लक्षात आले, तेव्हा त्यांनी या जिम ट्रेनरशी संपर्क साधून त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. गेल्या 7 महिन्यांपासून पती या ट्रेनरशी बोलत होते, परंतु आरोपी आता सरळ ब्लॅकमेलिंगवर उतरला होता, त्यामुळे शेवटी पोलिसांत धाव घ्यावी लागली.
खासगी फोटो आणि 5 लाख रुपयांची खंडणी
आरोपी शब्बीरने संबंधित महिलेसोबतचे काही वैयक्तिक आणि आक्षेपार्ह फोटो काढून घेतले होते. या फोटोंचा वापर करून त्याने महिलेच्या वैवाहिक आयुष्यात अडथळे निर्माण करण्यास सुरुवात केली आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेलिंग सुरू केले. जेव्हा महिलेच्या पतीने याबद्दल शब्बीरशी चर्चा केली, तेव्हा त्याने हे फोटो सार्वजनिक न करण्याच्या बदल्यात 5 लाख रुपयांची खंडणी मागितली. इतकेच नाही तर त्याने पतीला जीवे मारण्याची धमकीही दिली. एका प्रसंगी तर या जिम ट्रेनरने पतीच्या मोपेडची काच फोडून ती त्यांच्या गळ्याला लावली आणि पैशांची मागणी केली. या त्रासाला कंटाळलेल्या पतीने काही दिवसांपूर्वी एसओजी पोलिसांनी जिम चालकांसोबत घेतलेल्या बैठकीची बातमी पाहिली होती, ज्यावरून त्यांना आधार मिळाला आणि त्यांनी तात्काळ एसओजी पोलिसांशी संपर्क साधून हकीकत सांगितली.
हेही वाचा : गोरेगाव ड्रग्स पार्टी प्रकरणाला नवा ट्विस्ट, मुख्य आरोपी आनंद पटेलच्या बापाचा तर अक्षरश: धुमाकूळ
पीडित महिलेच्या पतीने पाल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर सुरत एसओजी पोलीस तातडीने सक्रिय झाले. पोलिसांनी सापळा रचून आरोपी शब्बीर असगर ट्रंकवाला याला अटक केली असून त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखून एसओजी टीमचे डीसीपी राजदीप सिंह नकुम यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी शहरातील सर्व जिम मालक आणि ट्रेनर्सची एक बैठक बोलावली होती. या बैठकीत सर्व जिम चालकांना त्यांच्याकडील ट्रेनर्सचे चारित्र्य पडताळणी करण्याचे आणि ते पूर्ण झाल्यावरच त्यांना कामावर ठेवण्याचे कडक निर्देश दिले होते. तसेच जिममध्ये येणाऱ्या महिलांशी कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त संबंध ठेवू नयेत, अशाही सूचना देण्यात आल्या होत्या, ज्याचे उल्लंघन या प्रकरणात दिसून आले आहे.









