वाशिम: ‘...भाजी बनवता येत नाही', मद्यधुंद अवस्थेत भावावर लोखंडी रॉडने प्रहार

मुंबई तक

Washim crime news : वाशिम जिल्ह्यातील कारंजा तहसील परिसरातील ब्राह्मण गावात धक्कादायक प्रकार उघडकीस आला. शेतात काम करणाऱ्या एका मजुराने दुसऱ्या मजुराची हत्या करून त्याला खड्ड्यात पुरण्यात आले होते.

ADVERTISEMENT

Washim crime news
Washim crime news
Google CTA

बातम्या हायलाइट

point

'तुला केवळ चपाती बनवता येते, तुला भाजी बनवता येत नाही'

point

लोखंडी रॉडने डोक्यावर प्रहार

Washim Crime News : जका खान - वाशिम जिल्ह्यातील कारंजा तहसील परिसरातील ब्राह्मण गावात एका शेत जमिनीच्या मालकाने मध्य प्रदेशातील व्यक्तींना मजुर म्हणून रोजावर ठेवले होते. ते दोघेही एकमेकांचे नात्याने भाऊ होते. शेत जमिनीच्या मालकाने पोलिसांना फोन लावून या घटनेची माहिती दिली होती. शेतात काम करणाऱ्या एका मजुराने दुसऱ्या मजुराची हत्या करून त्याला खड्ड्यात पुरण्यात आले होते. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. 

हे ही वाचा : डोंबिवली: मित्र-मेत्रिणींसोबत गणपतीच्या दर्शनाला गेली पत्नी, नवऱ्याने केला चाकूने हल्ला

कारंजा पोलिसांनी पुरलेला मृतदेह काढला बाहेर

कारंजा पोलिसांनी जिथे संबंधित व्यक्तीला पुरण्यात आले तिच जागा खोदकाम करून काढली. तिथेच मृत व्यक्ती युवराज दुरारी वरखडे (वय 40) याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला होता. युवराज वरखडे हा मध्य प्रदेश राज्यातील बेतुल जिल्ह्यातील छिंदवाडा तहसील कार्यालय परिसरातील मुलताई येथील मूळचा आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, हल्लेखोराने शेतमालकाला फोन करून आपण खून केल्याची माहिती दिली होती. 

'तुला केवळ चपाती बनवता येते, तुला भाजी बनवता येत नाही'

पोलिसांनी शेत मालकाकडे घटनेची तक्रार दाखल करत आरोपीची हत्या केल्याची माहिती दिली. पोलीस अधिकारी मनीष ठाकरे यांनी सांगितलं की, रविवारी आठवडी बाजार केल्यानंतर दोघांनी देखील मद्यपान केले होते. ते एकमेकांसोबत चालले असताना, युवराज दुरारी वरखडे हा आरोपीशी वाद घालू लागला होता. तुला केवळ चपाती बनवता येते, तुला भाजी बनवता येत नाही, त्याच विषयावर पुन्हा पुन्हा बोलत असताना, तो त्याला हाताने तर कधी पायाने मारहाण करत होता. 

हे ही वाचा : अल्पवयीन खेळाडूवर लैंगिक अत्याचार, सायकलिंग प्रशिक्षकावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

लोखंडी रॉडने डोक्यावर प्रहार 

अशातच शेतात पडलेल्या एका लोखंडी रॉडने त्याने मृताच्या डोक्यावर प्रहार केला. हल्ला इतका गंभीर होता की, मृत व्यक्तीच तिथेच कोसळला. संबंधित प्रकरणात आरोपीने शेतात एका खड्डा खाणून मृत व्यक्तीचा पुरले, नंतर तो घटनास्थळावरून फरार झाला होता.