फडणवीस सरकारचे 5 मोठे निर्णय! पाहा राज्यातील दुष्काळ निवारणासाठी CM काय करणार!
महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे २२ सप्टेंबर २०२६ रोजीचे महत्त्वाचे निर्णय जाणून घ्या. दुष्काळ निवारण, मेट्रो प्रकल्पबाधित शेतकरी, म्हाडा पुनर्विकास आणि कृषी विभागाच्या आकृतीबंधाबाबत सविस्तर माहिती.
ADVERTISEMENT

मुंबई: राज्यातील दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांना गती देण्यापासून ते मुंबईतील म्हाडाच्या जुन्या इमारतींच्या समूह पुनर्विकासापर्यंत, महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यासोबतच मुंबई मेट्रो प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना विकसित भूखंडांचे वाटप, धुळ्यातील आरक्षण बदल आणि कृषी विभागाच्या आकृतीबंधाबाबतही निर्णय घेण्यात आले आहेत.
मंत्रिमंडळाचे ५ महत्त्वाचे निर्णय
1. दुष्काळ निवारणासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन
राज्यातील दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांसाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- महसूल मंत्री या उपसमितीचे अध्यक्ष असतील.
- वेळोवेळी घ्याव्या लागणाऱ्या निर्णयांसाठी उपसमितीला सर्वाधिकार देण्यात आले आहेत.
- येत्या शनिवारपर्यंत प्राथमिक अधिसूचना काढण्यात येणार आहे.
- मंत्री बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी करणार आहेत.
- शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवण्याच्या कामाला गती देण्याचा उद्देश आहे.
2. मुंबई मेट्रो प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना विकसित भूखंड
मुंबई मेट्रो मार्ग 4, 4 A आणि 10 या प्रकल्पांच्या एकात्मिक कारशेड डेपोसाठी जमीन दिलेल्या मोघरपाडा येथील प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना मालकी हक्काने विकसित भूखंड वाटप करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
- मौजे मोघरपाडा येथील सर्व्हे क्रमांक 30 मधील शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.
- शेतकऱ्यांना 22.5 टक्के आणि 12.5 टक्के विकसित भूखंडांचे वाटप करण्यात येणार आहे.
3. मुंबईतील रामकृष्णनगरमधील म्हाडा इमारतींचा समूह पुनर्विकास
मुंबईतील खार पश्चिम येथील रामकृष्णनगर परिसरातील म्हाडाच्या जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींचा एकत्रित समूह पुनर्विकास करण्यात येणार आहे.
