‘सर्वांना मुबलक अन्न मिळेपर्यंत काजू-बदाम खाणं हे...’, चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य!

मुंबई तक

सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काजू-बदाम खाणं, दुष्काळ जाहीर करण्याची प्रक्रिया आणि शरद पवार यांच्या पत्रावर महत्त्वाचं वक्तव्य केलं. सांगलीत मागेल त्याला टँकर आणि 5 ऑक्टोबरच्या दुष्काळ आढाव्याबाबत जाणून घ्या.

ADVERTISEMENT

bjp minister chandrakant patil kaju badam statement sangli drought update october 5
चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य!
Google CTA

सांगली: राज्यातील अनेक भागांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकरी संकटाचा सामना करत आहेत. अशातच दुष्काळाच्या आढावा बैठकीदरम्यान मंत्र्यांनी काजू-बदाम खाल्ल्याच्या चर्चेवरून राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर सांगलीचे पालकमंत्री आणि राज्याचे शिक्षण व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काजू-बदाम खाण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “जोपर्यंत मुबलक अन्न सर्वांना मिळत नाही, तोपर्यंत चैन करण्याची परवानगी नाही,” असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं.

तसंच, दुष्काळ जाहीर करण्याच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिल्याबद्दल चंद्रकांत पाटील यांनी त्यांचे आभार मानले. मुख्यमंत्री संवेदनशील असून, त्यांनी दुष्काळाच्या उपाययोजना आधीपासूनच सुरू केल्या आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

काजू-बदाम खाणं चुकीचंच; चंद्रकांत पाटलांचं स्पष्ट मत

सध्या राज्यभरात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक भागांमध्ये पावसाअभावी शेतकरी अडचणीत आले आहेत. अशा परिस्थितीत नांदेड येथे झालेल्या दुष्काळ आढावा बैठकीदरम्यान कृषिमंत्र्यांसह इतर मंत्र्यांनी काजू-बदाम खाल्ल्याच्या चर्चेला जोर आला आहे.

या चर्चेबाबत सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना विचारण्यात आलं असता, त्यांनी अशा प्रकारचं वागणं चुकीचं असल्याचं मत व्यक्त केलं.