शिंदेंच्या 'या' दिग्गज मंत्र्याने 22 वर्षांपूर्वीच केला होता विद्यानंद बापटांचा सत्कार, कारण...

मुंबई तक

पुण्यात डीजे-डॉल्बीविरोधात भूमिका मांडणारे विद्यानंद बापट 2004 मध्येही चर्चेत होते. रत्नागिरीतील गोळप येथे उदय सामंत यांच्या उपस्थितीत झालेल्या गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळ्यात त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला होता.

ADVERTISEMENT

vidyanand bapat pune dj dolby ban demand 2004 ratnagiri student felicitation shiv sena shinde minister uday samant
विद्यानंद बापट
Google CTA

गोकूळ कांबळे, रत्नागिरी: पुणे महानगरपालिकेच्या सभेत डीजे-डॉल्बी सिस्टिमवरील बंदीचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर चर्चेत आलेले विद्यानंद बापट यांची गुणवत्ता तब्बल 22 वर्षांपूर्वीच रत्नागिरीकरांनी ओळखली होती. 2004 मध्ये गोळप येथे आयोजित गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळ्यात तत्कालीन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि विद्यमान आमदार तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत बापट यांचा गुणवंत विद्यार्थ्यांच्या यादीत समावेश होता. या कार्यक्रमाची जुनी वृत्तपत्रीय कात्रणे आणि छायाचित्रे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

पुण्यातील डीजे-डॉल्बीविरोधी भूमिकेमुळे चर्चेत

पुणे महानगरपालिकेच्या सभेत डीजे आणि डॉल्बी सिस्टिमवरील बंदीचा मुद्दा मांडल्यामुळे विद्यानंद बापट यांचे नाव चर्चेत आले. या मुद्द्यावर सभेत काही जणांनी विरोध केल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी सुरक्षित वातावरणात त्यांना सभागृहाबाहेर नेले.

हे ही वाचा>> 'शर्करावगुंठित'.., विद्यानंद बापटांनी पेटाऱ्यातून नवा शब्द काढला, अर्थ आहे तरी काय?

या घटनेनंतर बापट यांच्या भूमिकेची आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची चर्चा सुरू झाली. मराठी, संस्कृत आणि इंग्रजी भाषेवरील त्यांचे प्रभुत्व, विविध विषयांतील संदर्भांची माहिती, प्रचंड वाचन आणि आकलनशक्ती यामुळे ते अनेकांच्या चर्चेचा विषय ठरले आहेत.

2004 मध्येच गोळपमध्ये झाला होता गुणगौरव

विद्यानंद बापट यांच्या गुणवत्तेची दखल आजच नव्हे, तर तब्बल 22 वर्षांपूर्वीच घेण्यात आली होती. रत्नागिरी तालुक्यातील गोळप पंचशीलनगर येथे आदर्श युवक मंडळाच्या वतीने 2004 मध्ये विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.